SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

एक हजार लोक एकाच वेळी व्हिडीओ पाहू शकणार..! या ॲपमध्ये फिचर्सची धमाल, जाणून घेण्यासाठी वाचा..

प्रायव्हसी पॉलिसी जाहीर केल्यापासून अनेकांनी व्हॉट्स अॅपला सोडचिठ्ठी देताना टेलिग्राम हे मेसेजिंग अॅप वापरण्यास सुरुवात केली. त्यामुळे टेलिग्राम वापरकर्त्यांची संख्या एकदम वाढली होती. अगदी कमी कालावधीत टेलिग्राम अॅपने व्हाॅटस अपला जोरदार टक्कर दिली.

टेलिग्राम या लोकप्रिय मेसेजिंग ॲपमध्ये नवं अपडेट आलं आहे. त्यात अनेक फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार या ॲपवरील व्हिडिओ कॉलमध्ये एकाच वेळी तब्बल १००० लोकांनी सहभागी होता येणार आहे. तसचे वापरकर्त्यांना व्हिडीओ संदेश पाठविण्याचीही परवानगी मिळणार आहे.

Advertisement

एवढेच नाही, तर टेलीग्रामने आता सर्व व्हिडीओ कॉलसाठी ध्वनीसह स्क्रीन शेअरिंगचे समर्थन केले आहे, ज्यात वन ऑन वन कॉल आणि बरेच काही समाविष्ट आहे.

व्हिडिओ पाहताना 0.5x किंवा 2x असे पर्याय असतील ज्यामुळे व्हिडिओ आपल्याला कमी किंवा अधिक वेगात पाहता येतील. व्हिडिओ मेसेजेसही अधिक चांगल्या गुणवत्तेचे असतील.

Advertisement

नव्या व्हिडिओ कॉल्समध्ये आता ३० यूजर्स त्यांचा कॅमेरा व्हिडिओ किंवा स्क्रीन ब्रॉडकास्ट करू शकतील आणि १००० लोक हा ग्रुप व्हिडिओ कॉल पाहू शकतील! येत्या काळात अमर्याद लोकांना (म्हणजे थोडक्यात स्ट्रीमप्रमाणे) व्हिडिओ कॉल पाहता येईल, अशी सोय आणत असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

व्हिडिओ मेसेजेस अधिक जास्त रेजोल्यूशनमध्ये असतील. एखाद्या मेसेजवर टॅप केल्यावर तो अधिक मोठ्या स्वरूपात दिसेल आणि तिथे fast forward किंवा rewind चाही पर्याय असणार आहे.

Advertisement

मीडिया प्लेयरमध्ये प्ले-बॅक स्पीड नियंत्रित करता येईल. त्यामध्ये आता 0.2x, 0.5x, 1.5x आणि 2x असे पर्याय मिळतील.

व्हिडिओमधील नेमक्या सेकंदाचा टाइम caption मध्ये लिहिल्यास, त्या सेकंदावर जाता येतं. आता या टाइम स्टॅम्पलाच दुसऱ्या चॅटमध्ये लिंकद्वारे शेअर करता येणार आहे. वन टू वन स्क्रीन शेअरिंग करता येईल. शिवाय डिव्हाईसमधील आवाजसुद्धा ब्रॉडकास्ट होईल.

Advertisement

मीडिया एडिटरमध्ये आता झुम करून एडिट करता येईल. त्यामुळे अचूक जागीच मजकूर किंवा ब्रश एडिट करता येईल. यासोबत नेहमीप्रमाणे नव्या ॲनिमेटेड इमोजीसुद्धा आणल्या आहेत.

 

Advertisement