SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सरकारी नोकरीची संधी..! रेल इंडियात विविध पदांसाठी भरती, लगेच करा अर्ज

आयुष्यात बहुतेक लोकांचे सरकारी नोकरीचे स्वप्न असते. तुम्हीही असेच स्वप्न पाहत असाल, तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. सरकारी नोकरी मिळविण्याची संधी चालून तुमच्याकडे आली आहे.

रेल इंडिया टेक्निकल अॅंड इकाेनाॅमिक सर्व्हिस लिमिटेड (RITES)मध्ये एकूण २६ पदांसाठी भरती केली जाणार आहे. असिस्टंट मॅनेजर आणि टेक्निशियन पदांसाठी नोटीफिकेशन जारी करण्यात आले आहे. ‘आरआयटीईएस’च्या अधिकृत वेबसाईटवर उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज करता येणार आहेत.

Advertisement

या पदांसाठी होणार भरती
असिस्टंट मॅनेजर – ६ जागा
टेक्निशियन – २० जागा

शैक्षणिक पात्रता
असिस्टंट मॅनेजर –
या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून उमेदवाराने संबंधित विषयात इंजिनिअरिंगची डिग्री वा डिप्लोमा केलेला असणे आवश्यक.

Advertisement

टेक्निशियन – या पदासाठी उमेदवाराकडे आयटीआयची डिग्री असणे गरजेचे आहे.

वयाची अट
वरील पदांसाठी उमेदवारांचे वय ५५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. भरतीबाबत सविस्तर माहितीसाठी जारी करण्यात आलेले अधिकृत नोटीफिकेशन पाहावे.

Advertisement

निवडप्रक्रिया
शैक्षणिक पात्रतेच्या आधारे तयार करण्यात आलेल्या गुणवत्तेवर उमेदवारांची भरती केली जाणार आहे.

महत्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत – १३ ऑगस्ट २०२१
अधिकृत वेबसाईट- rites.com

Advertisement