SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ऑल इन वन..! जिओचा धमाकेदार ‘प्रीपेड रिचार्ज प्लॅन’, ग्राहकांचा होणार असा फायदा, जाणून घेण्यासाठी वाचा..

रिलायन्स जिओने एअरटेलला टक्कर देण्यासाठी एक जबरदस्त ‘प्रीपेड रिचार्ज प्लॅन’ बाजारात आणलाय. कमी पैशांत जादा सुविधा देत असल्याने जिओचा हा प्लॅन ग्राहकांच्या पसंतीस नक्की उतरेल, असा दावा करण्यात आला आहे.

रिलायन्स जिओ (Reliance Jio)च्या या नव्या ‘प्रीपेड रिचार्ज प्लॅन’चे नाव आहे, ‘ऑल इन वन..’ केवळ 75 रुपयांच्या या प्लॅनमध्ये जिओने अनेक सुविधा दिल्या आहेत. त्यामुळे अन्य मोबाइल कंपन्या, विशेषत: एअरटेल (Airtel) समोर मोठे आव्हान ठाकणार आहे. ‘ऑल इन वन’ प्लॅनची वैशिष्ट्ये जाणून घेऊ या..

Advertisement

‘ऑल इन वन’ प्लॅनची वैशिष्ट्ये

  • प्लॅनमध्ये तीन जीबी इंटरनेट डेटा
  • प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे.
  • शिवाय या प्लॅनमध्ये स्वतंत्रपणे 200 एमबी डेटाही दिला जातो.
  • अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही मिळणार आहे
  • तसेच 50 SMS देखील या प्लॅनमध्ये मिळतील.
  • जिओच्या सगळ्या कॉम्प्लिमेंटरी अॅप्सना मोफत अॅक्सेस मिळणार.

इंटरनेट, कॉलिंग, एसएमएस अशा सगळ्याच सुविधा फक्त 75 रुपयांत आणि 28 दिवसांसाठी मिळत असल्याने या प्लॅनला ‘ऑल इन वन’ असे नाव देण्यात आलं आहे.

Advertisement

एअरटेलचा आतापर्यंत सर्वांत कमी रिचार्ज 49 रुपयांचा (28 दिवसांची वैधता) होता. त्यात ग्राहकांना 38.52 रुपये टॉकटाइम, 100 एमबी डेटा मिळत होता. 100 एमबी डेटा संपल्यानंतर 0.50 रुपये प्रति एमबी शुल्क आकारलं जात होतं; मात्र कंपनीने 29 जुलै 2021 पासून हा प्लॅन बंद केला.

दरम्यान, आता एअरटेलच्या ग्राहकांना कमीत कमी 79 रुपयांचे रिजार्च करावे लागणार आहे. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची असून, त्यात 64 रुपये टॉकटाइम, तर 200 एमबी इंटरनेट डेटा मिळतो. एक पैसा प्रति सेकंद या दराने लोकल आणि एसटीडी कॉल करता येईल.

Advertisement

एअरटेलचा हा प्लॅन चांगला असला, तरी जिओच्या ‘ऑल इन वन प्लॅन’च्या तुलनेत त्यात मिळणाऱ्या सुविधा कमी आहेत. त्यामुळे जिओच्या ‘ऑल इन वन’ प्लॅनमुळे एअरटेलला वेगळा निर्णय घ्यावा लागणार आहे.

Advertisement