SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

कोरोना लस घेतली की, रोगप्रतिकारक शक्ती ‘इतके’ दिवस टिकते? केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी जाणवत असला तरी कोरोना रुग्णांची संख्या ठिकाणानुसार कमी-अधिक होणं चालूच आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे देशात खूप मोठ्या प्रमाणात लसीकरण प्रक्रिया सुरु आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण (Vaccination) हाच उत्तम उपाय असल्याचे म्हटले जात आहे.

कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी जगभरात लसीकरणावर सर्वाधिक भर दिला जात आहे. भारतात तीन लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. देशव्यापी मोहिमेत आतापर्यंत 44.19 कोटी लोकांना कोरोना विषाणू प्रतिबंधक लस दिली गेली आहे.

Advertisement

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेतल्यावर कमीत कमी 2 ते 3 आठवड्यांनी (12 ते 18 दिवसांत) रोगप्रतिकार शक्ती (Immunity) निर्माण होते.

महाराष्ट्राचे आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास म्हणतात..

Advertisement

“पहिला डोस (First Dose) घेतला की, अंदाजे 42 दिवसांनी शरीरात रोगप्रतिकार शक्ती तयार होते. मात्र, यासाठी लसीचा दुसरा डोसही (Second Dose) घेणं गरजेचं आहे”, असं महाराष्ट्राचे आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी म्हटले आहे.

कोरोनावरील लस घेतली की त्या शरीरात जी रोगप्रतिकार शक्ती तयार होते हे नक्की पण ती किती दिवस टिकेल हे अजूनही निश्चित केले गेले नाही. हे आपल्या शरीरावर देखील तितकंच अवलंबून असतं. त्यामुळे लस घेतल्यानंतरही मास्क घालणं, हात धूणं, सोशल डिस्टंसिंगचं पालन महत्त्वाचं आहे, असं आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.

Advertisement

भारतात सध्या सीरम इन्स्टिट्यूटच्या (serum institute of india) कोव्हिशिल्ड (covishield) आणि भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) कोव्हॅक्सिन (covaxin) आणि रशियाच्या स्फुटनिक व्ही (Sputnik-V) या लसी सध्या भारतातील नागरिकांना देण्याचं काम चालूच आहे. तर, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन ( johnson and johnson vaccine) या लसींच्या काही चाचण्या बाकी असल्यामुळे किंवा सरकारडून मंजुरी घेण्यासाठी प्रतिक्षेत आहेत.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement