SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बारावीच्या निकालापूर्वी महत्वाची अपडेट..! बोर्डाकडून महत्वपूर्ण माहिती जारी, जाणून घेण्यासाठी वाचा..!

दहावीनंतर आता सगळ्याचं लक्ष बारावीच्या निकालाकडे लागले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही ३१ जुलैपूर्वी निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे कदाचित आज तरी निकाल जाहीर केला जाईल, अशी आशा होती. मात्र, त्यास विलंब होताना दिसत आहे..

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पूरस्थिती होती. त्यामुळे बोर्डाचे प्रशासकीय कामकाज होऊ शकले नाही. आता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर केला जाणार असल्याचे सांगण्यात येत असले, तरी निकालाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

Advertisement

बारावीचा निकाल जाहीर होण्यास विलंब होत असताना, राज्य मंडळाकडून एक महत्वाची अपडेट आली आहे. ते म्हणजे, बोर्डाने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांचे रोल नंबर आणि सीट नंबर जारी केले आहेत.

कोरोनामुळे यंदा बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी प्रवेशपत्रेच दिली नाहीत. प्रवेशपत्रावर विद्यार्थ्यांचा सीट नंबर असतो. प्रवेशपत्रेच दिलेली नसल्याने सीट नंबर कसा मिळणार, मग बारावीचा निकाल कसा पाहणार, असा प्रश्न निर्माण झाला होता.

Advertisement

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बोर्डाने आता HSC रोल नंबर / सीट नंबर तपासण्यासाठी लिंक अॅक्टिव्ह केली आहे. तेथे विद्यार्थ्यांना आपला सीट नंबर पाहता येणार आहे.

कसा चेक कराल सीट नंबर..?
अधिकृत वेबसाइट mh-hsc.ac.in वर जा.
मुख्यपृष्ठावर, जिल्हा आणि तालुका निवडा
तेथे आपले नाव टाका. रोल नंबरच्या तपशीलांसह एक यादी स्क्रिनवर दिसेल.
आपलं नाव आणि सीट नंबर तपासून तो नोट करुन ठेवा.

Advertisement

विशेष मूल्यांकन पद्धतीने निकाल लागणार
दरम्यान, दहावीप्रमाणे बारावीचा निकालही विशेष मूल्यांकन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. त्यानुसार 40:30:30 या फॉर्म्युल्यानुसार हा निकाल लावण्यात येणार आहे. त्यात विद्यार्थ्यांचे दहावी, अकरावीच्या मार्कांना प्रत्त्येकी 30 टक्के वेटेज आहे. तसेच बारावीतील अंतर्गत परीक्षा, असायमेन्टसना 40 टक्के वेटेज असेल. त्यानुसार निकाल जाहीर केला जाणार आहे.

Advertisement