SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मोठी बातमी: शेतकरी ‘या’ मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणी करू शकणार, कर्ज घेण्यासाठी होणार फायदा..

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आपल्या पिकाची रिअल टाईम नोंदणी करण्यासाठी राज्यातील महसूल विभागाने सुविधेची सोय करून दिली आहे. राज्य महसूल विभागाने यासाठी स्वतंत्र ॲप्लिकेशन ई-पीक पहाणी (E-Peek Pahani App) डेव्हलप केलं आहे, ते शेतकऱ्यांसाठी फायद्याचं ठरणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात काय म्हणाले..

Advertisement

शेतकऱ्यांना शेतजमिनीच्या उताऱ्यांवर पिकांची नोंद केल्याने त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, दुष्काळ,अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणं शक्य होतं.

मात्र होतं असं की, बऱ्याच ठिकाणी 2-3 गावे मिळून एकच तलाठी गावांमध्ये कार्यरत असतो. त्यामुळे पीक पाहणी अचूक नोंदवली जात नाही, अशी शेतकऱ्यांची कायम तक्रार होती. ई-पीक नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांना आपल्या अचूक क्षेत्राची माहीती झाली, तर पीक कर्जही मिळण्यास मदत होते.

Advertisement

आता यावर तोडगा म्हणून राज्याच्या महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या पिकाची रिअल टाइम नोंदणी करण्यासाठी साधी-सोपी सुविधा आणली आहे. यामुळे थेट शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र मोबाईल ॲप्लिकेशन (E-Peek Pahani Mobile App) काढल्याची माहीती राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

‘या’ ॲप्लिकेशनने काय होईल..?

Advertisement

▪️सरकारने टाटा ट्रस्टच्या सहाय्याने हे ॲप्लिकेशन आणलं आहे. (E-Peek Pahani is Project by Tata Trusts with Government of Maharashtra) या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये शेतकरी पिकांची माहिती भरतील.

▪️ ई-पीक पाहणी ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा आणि आवश्यक माहीती भरा 👉 https://play.google.com/store/apps/details?id=in.synergyconnect.test

Advertisement

▪️ तलाठी या पिकांच्या नोंदी तपासून घेतील. यामुळे पीक पेरणीची रिअल टाईम माहिती अप्लिकेशनमध्ये संकलित होणार आहे.

▪️ ही माहिती संकलित होताना पारदर्शकता येणार आहे. पीक पाहणी नोंदणीमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढणार आहे.

Advertisement

▪️ पीक विमा आणि पीक पाहणीचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे.

▪️ शेतकऱ्यांना पीककर्ज (Agricultural Loan) मिळण्यातही यामुळे सुलभता येईल.

Advertisement

ई-पीक नोंदणी प्रकल्प राज्यभर राबवणार

ई-पीक पाहणी केल्याने राज्याभरातील असणाऱ्या पिकांची क्षेत्र हे अचूक कळणार आहे. यामुळे आपल्या राज्यामधील आर्थिक पाहणी आणि कृषी नियोजन करणे शक्य होणार आहे. यापूर्वी ई-पीक नोंदणी प्रकल्प हा प्रायोगिक तत्वावर राज्यातील 20 तालुक्यामध्ये राबवण्यात आला होता, तो यशस्वी झाल्यानंतर राज्यभर राबविण्याचा निर्णय बाळासाहेब थोरात यांनी घेतला. यासंबंधीराज्य सरकारने शासन आदेश जारी केला आहे. अंमलबजावणीसाठी सरकारने राज्य स्तरीय, विभागीय जिल्हा स्तरीय आणि तालुका स्तरीय सनियंत्रण समित्या गठीत केल्या आहेत. तसेच, पूर्ण वेळ प्रकल्प अंमलबजावणी कक्ष संचालक भूमी अभिलेख, पुणे यांच्या नियंत्रणाखाली सुरू करण्यात आला आहे.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement