SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

धक्कादायक! आयसीआय बँकेत दरोडेखोरांचा हल्ला; शाखा व्यवस्थापकाचा मृत्यू

विरारमध्ये गुरुवारी (काल) रात्री 8 च्या सुमारास धक्कादायक घटना घडली आहे. विरार शहरातील आयसीआयसीआय बँकेच्या (ICICI) शाखेवर रात्री 8 वाजेच्या आसपास काही जणांनी प्राणघातक हल्ला करत बँक लुटण्याचा प्रयन्त केला. या हल्ल्यात शाखा व्यवस्थापक महिला अधिकाऱ्याचा मृत्यू झाला, तर कॅशियर महिला जखमी झाली आहे.

नेमकं ‘हे’ प्रकरण कसं घडलं?

Advertisement

विरार पूर्व स्टेशन भागातील मनवेल पाडा येथे आयसीआयसीआय बँकेची शाखा (ICICI Bank, Virar) आहे. गुरुवारी (29 जुलै) सायंकाळी जेव्हा बँक बंद झाली, तेव्हा बँकेचे सगळे कर्मचारी निघून गेले होते. त्यावेळी बँकेत रोखपाल श्वेता देवरूख आणि व्यवस्थापक योगिता वर्तक या दोघीच होत्या.

मिळालेल्या माहीतीनुसार, काल रात्री सुमारे 8 वाजेच्या दरम्यान बँकेचा माजी मॅनेजर अनिल दुबे बँकेत आला व त्याने बॅंकेत घुसून चाकूचा धाक दाखवण्यास सुरुवात केली. त्याने दमदाटी करून बँकेतील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा ऐवज लुटण्याचा प्रयत्न केला.

Advertisement

या वेळी बॅंकेच्या कॅशियर श्वेता देवरूख आणि मॅनेजर योगिता वर्तक या दोघींनी विरोध करण्याचा प्रयत्न केला विरोध करताच चाकूने अचानक दोघींवर त्याने हल्ला केला. घटनेची माहीती मिळताच विरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही महिला कर्मचाऱ्यांना रुग्णालयात हलविले होते. मात्र यात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. या हल्ल्यात योगिता वर्तक यांचा जागीच मृत्यू (Lady manager killed) झाला, तर कॅशियर महिला कर्मचारी गंभीर जखमी झाल्या.

‘त्या’ दरोडेखोराला नागरिकांनी पकडलं

Advertisement

विरार पोलिसांनी दोन्ही जखमी महिला कर्मचाऱ्यांना रुग्णालयात हलविले गेले. विरार पोलिसांनी या घटनास्थळावरून एका दरोडेखोराला अटक केली आहे. आरोपी दुबे याला सोने आणि पैशाची बॅग घेऊन फरार होत असताना नागरिकांनी पकडले. नागरिकांनी मोठं धाडस दाखवत त्याला पकडून ठेवलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement