SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नोकिया कंपनी ‘हा’ टॅबलेट लॉंच करणार, कमी किंमतीत आकर्षक फीचर्स कोणते मिळणार वाचा..

नोकियाचा (Nokia) टॅबलेट iPadशी स्पर्धा करण्यासाठी सज्ज होत आहे. HMD Global लवकरच आपला हा टॅबलेट लॉंच करणार आहे. त्याचे नाव नोकिया टी 20 टॅबलेट (Nokia T20 Tablet) असेल. कमी किमतीत जास्तीत जास्त फीचर्स उपलब्ध होईल, अशी या टॅबलेटविषयी चर्चा सुरू झाल्या आहे.

एचएमडी ग्लोबल (HMD Global) लवकरच पुढील काही महिन्यातच नोकिया टी 20 टॅबलेट (Nokia T20 Tablet ) लॉंच करणार आहे. किंमत आणि वैशिष्ट्ये लॉन्च होण्यापूर्वीच लीक झाली आहेत. अशी माहीती आहे की, हा टॅबलेट बाजारात धुमाकूळ घालू शकतो. यामध्ये 10.36 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे.

Advertisement

टॅब्लेट बाजारामध्ये सॅमसंग आणि आयफोनने लोकांची मने जिंकली आहेत. आता दुसरीकडे नोकिया या कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी आपला हा टॅबलेट बाजारात आणत आहे. टॅब्लेटची किंमत आणि वैशिष्ट्ये लॉंच होण्याआधी लीक झाली आहेत.

नोकिया टी 20 टॅबलेटचे आकर्षक फिचर्स:

Advertisement

▪️ मिळालेल्या माहितीनुसार, नोकिया टी 20 टॅबलेट ( Nokia T20 Tablet ) दोन प्रकारामध्ये लॉंच होण्याची शक्यता आहे.

▪️ वाय-फाय (wifi) आणि वाय-फाय + 4 जी (4G) प्रकारात येण्याची शक्यता आहे.

Advertisement

▪️ नोकियाच्या या टॅब्लेटमध्ये 10.36 इंच फुल एचडी प्लस क्वालिटी असणारा डिस्प्ले मिळू शकतो.

▪️ रॅम आणि मेमरी: नोकियाच्या या टॅब्लेटमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज देण्यात येऊ शकते.

Advertisement

नोकिया टी 20 टॅब्लेटची किंमत किती असू शकते?

Nokia T20 Tablet हा टॅबलेट पहिल्यांदा युरोपियन देशांमध्ये लॉंच केला जाऊ शकतो. याच्या 4G व्हेरिएंटची किंमत जवजवळ 20 हजार रुपये व वाय-फाय (Wifi) प्रकाराची किंमत 19 हजार रुपयांच्या आसपास असू शकते. हा आकर्षक टॅबलेट यावर्षी सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये लॉंच केला जाऊ शकतो.

Advertisement

नोकिया कंपनीने याआधीही टॅब्लेट लॉंच केले आहेत. सांगायचंच झालं तर Nokia N1 आणि Nokia Lumia नंतर लॉंच करण्यात येणारा Nokia T20 Tablet हा तिसरा टॅबलेट असेल. हे दोन्ही टॅबलेट 2014 आणि 2013 मध्ये लॉंच केले होते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement