SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘या’ आयटी कंपनीत होणार मेगाभरती, तब्बल 1 लाख जणांना मिळणार नोकरी!

कोरोनामुळे (Corona) देशभरात लॉकडाउन किंवा कडक निर्बंध जारी करण्यात आले. या स्थितीचा एकूणच अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झाला. अनेकांचा रोजगार बुडाला. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेतही मंदी आली. आता कोरोनाची दुसरी लोट ओसरत असताना अनेक कंपन्यांत मेगाभरती सुरु झालीय.

आयटी कंपनीत काम करावं, असं अनेकाचं स्वप्न असतं. अनेक तरुणाचं हे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. प्रसिद्ध अमेरिकन आयटी कंपनी कॉग्निझंट अनेकांना रोजगार देणार आहे.

Advertisement

कॉग्निझंट कंपनीच्या उतपन्नात जूनच्या तिमाहीत विक्रमी वाढ झाली. जून महिन्याच्या तिमाहीमध्ये कंपनीचे उतपन्न हे 41.8 टक्क्यांनी वाढून 51.02 कोटी अमेरिकन डॉलरच्या आसपास म्हणजे 3 हजार 801 कोटीपर्यंत पोहचलं. वाढलेल्या उत्पन्नामुळे आता कंपनीला अधिक कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. आमचा 1 लाख जणांना रोजगार देण्याचा मानस असल्याचं कंपनीने सांगितलंय.

कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार..

Advertisement

कंपनीचे सीईओ ब्रायन हम्फरिज यांनी सांगितलं, की 2021च्या अखेरपर्यंत कंपनी सुमारे 1,00,000 लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी योजना आखत आहे. कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार, यावर्षी साधारण 30 हजार नवीन पदवीधरांना संधी देणार आहे. याशिवाय सुमारे 1,00,000 असोसिएट्सना कंपनीकडून प्रशिक्षण दिलं जाणार आहे.

कॉग्निझंट 2021 मध्ये नव्या पदवीधरांना (Fresh Graduates) नोकरी देण्याचा विचार करत आहे. तसंच 2022मध्ये नव्या 45 हजार ग्रॅज्युएट झालेल्या उमेदवारांना कंपनीत जॉईन करुन घेण्याचा योजना आखत आहे.

Advertisement

2 लाख जणांना मिळणार रोजगार
कॉग्निझंट कंपनीने 2 लाख जणांना सध्या नोकरी दिली आहे. कंपनीच्या उत्पन्नात चांगलीच वाढ झाली आहे. आम्ही ग्राहकांना पूर्णपणे मदतीसाठी बांधील आहोत, असंही हम्फ्रीज यांनी नमूद केलं.

आयटी क्षेत्रात नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी लवकरच कॉग्निझंट या दिग्गज आयटी कंपनीत नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची माहिती येत्या काही दिवसांत जाहीर केली जाऊ शकते.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/Breaking

Advertisement