SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

राज्यातील 25 जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल, राज्य सरकारचा मोठा निर्णय, काय सुरु-काय बंद राहणार जाणून घेण्यासाठी वाचा..

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने राज्यातील 25 जिल्ह्यामध्ये निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे. मात्र, कोरोनाची परिस्थिती गंभीर असलेल्या 11 जिल्ह्यांत लेव्हल तीनचे नियम कायम राहणार असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाची बैठक झाली. त्यात राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यावर निर्बंध शिथील करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला.

Advertisement

माध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, की “राज्यातील 25 जिल्ह्यांतील कोरोनाची परिस्थिती राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील सर्व निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेे यांनी प्रस्तावावर सही केल्यावर निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.”

दरम्यान, राज्यातील 11 जिल्ह्यांतील कोरोनाची परिस्थिती अजूनही गंभीर आहे. त्यामुळे हे जिल्हे लेव्हल तीनमध्येच राहणार आहेत. तेथील निर्बंध शिथील केले जाणार नसल्याचे मंत्री टोपे यांनी स्पष्ट केले.

Advertisement

निर्बंध शिथिल होणारे जिल्हे
मराठवाडा : परभणी, लातूर, जालना, नांदेड, हिंगोली, औरंगाबाद, उस्मानाबाद.
विदर्भ : अमरावती, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, बुलढाणा, भंडारा. यवतमाळ, वर्धा, वाशीम, हिंगोली.

कोकण : रायगड, ठाणे, मुबई
उत्तर महाराष्ट्र : जळगांव, धुळे, नंदुरबार, नाशिक

Advertisement

या जिल्ह्यांत निर्बंध कायम
पश्चिम महाराष्ट्र :
पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर.
कोकण : रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर.
मराठवाडा : बीड
उत्तर महाराष्ट्र : नगर.

कोणते निर्बंध शिथिल होणार?

Advertisement
  • शनिवार-रविवार पूर्णपणे बंदऐवजी शनिवारी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरू राहतील, फक्त रविवारी बंद
  • खासगी कार्यालयांतील सर्व कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण झालं असल्यास ५० टक्के कर्मचारी क्षमतेनुसार कार्यालये सुरू करण्याची मुभा.
  • शॉप, रेस्टॉरंट, सिनेमा हॉल अटींसह सुरू करण्यात येऊ शकतील.
  • थिएटर्स, व्यायामशाळांना काही प्रमाणात सूट मिळू शकते.
  • एसी हॉलमध्ये गर्दी होऊ नये, तसेच लग्न, राजकीय कार्यक्रमात गर्दी होऊ नये, यासाठी निर्बंधांचा जीआर मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर काढला जाणार आहे.

लोकलबाबत लवकरच निर्णय
लोकल प्रवासाबाबत पुढील एक ते दोन दिवसांत निर्णय घेण्याची शक्यता असल्याचे सांगून टोपे म्हणाले, की रेल्वे विभागाशी चर्चा करून लोकल सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील. तसेच कर्मचाऱ्यांचे पूर्ण लसीकरण करून सिनेमागृहे, मॉल सुरु करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाल्याचे टोपे यांनी सांगितले.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/Breaking

Advertisement