SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

India vs Sri Lanka 2nd T20: अम्पायरची एक चूक आणि भारताचा पराभव; नाहीतर भारताच्या नवख्या खेळाडूंनी श्रीलंकेला रडवलेच होते!

भारताच्या शिखर धवननं सामना लढवत दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात श्रीलंकेसमोर 133 धावांचे लक्ष्य ठेवले. शिखरनं 40 धावांची खेळी केली, त्याला देवदत्त पडिक्कल ( 29) व ऋतुराज गायकवाड (21) या नवीन खेळाडूंची साथ मिळाली.

थोड्याश्या धावांचे टार्गेट श्रीलंकेला भारी पडल्याचे नक्कीच दिसले. टीम इंडियाच्या राखीव फळीतील ‘राखीव’ खेळाडूंनी यजमानांना जिंकण्यासाठी संघर्ष करण्यास भाग पाडले. श्रीलंकेनं अखेरच्या षटकात सामना जिंकून मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. धनंजया डी सिल्व्हा ( 39*) व चमिका ( 12*) यांनी पराभव केला. (Sri Lanka squeeze win in second T20 against India)

Advertisement

ऋतुराज गायकवाड व शिखर धवन यांनी 49 धावांची भागीदारी केली. देवदत्त पडिक्कल आणि शिखर यांची 32 धावांची भागीदारी अकिला धनंजयानं संपवली. देवदत्त व संजू सॅमसन यांना मोठी खेळण्याची संधी होती, परंतु त्यांनाही मोकळे फटके मारता आले नाही.

➖➖➖➖➖➖

Advertisement

🏏 खेळाची आवड आहे? मग खेळता खेळता कमवा पैसे

‍♂ My 11 Circle अँप डाऊनलोड करा आणि जिंका फक्त रु. 1 मध्ये 1 कोटी

Advertisement

🔗 अँप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा : 👉🏻 https://bit.ly/3kGeENV

➖➖➖➖➖➖

Advertisement

वनिंदु हसरंगा यानं टाकलेल्या 16व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर देवदत्तनं सुरेख रिव्हर्स स्वीप मारून चौकार मिळवला, परंतु पुढच्याच चेंडूवर तो त्रिफळाचीत झाला. सॅमसनही (7) पुढच्या षटकात धनंजयाच्या गोलंदाजीवर बाद झाला. भारताला 20 ओव्हरमध्ये 5 बाद 132 धावा करता आल्या.

श्रीलंकेची सुरुवात आक्रमक होती. परंतु राहुल चहरनं सुरेख झेल टिपून लंकेला पहिला धक्का दिला. भुवनेश्वर कुमारनं टीम इंडियाला पहिलं यश मिळवून दिलं, त्यानंतर वरुण चक्रवर्थीनं विकेट घेतली. कुलदीप यादवनं भारताला तिसरं यश मिळवून दिलं. त्यानं दुसरी विकेट घेताना मिनोद भानूकाला (36) बाद करून मोठी विकेट मिळवून दिली.

Advertisement

राहुलनं टीमला विकेट मिळवून दिली. वनिंदू हसरंगा (15) भुवीच्या हातात झेल देऊन माघारी परतला. मग श्रीलंकेचे फलंदाज दडपणाखाली आले अन् त्यांच्या चुकांचा फायदा टीम इंडियाला झाला. चेतन साकरियानं 18व्या षटकात रमेश मेंडिसला (2) बाद केले.नवदीप सैनीला दुखापतीमुळे मैदानाबाहेर जावं लागले.

अखेरच्या षटकात श्रीलंकेला विजयासाठी 8 धावांची गरज होती अन् अम्पायरनं चेतन सकारियानं टाकलेला दुसरा चेंडू वाईड ( WIDE) दिला. त्यावर लंकेला दोन धावा मिळाल्या अन् त्याचा फटका बसला. लंकन फलंदाज ऑफसाईडला आलेला होता अन् चेतननं चतुराईनं चेंडू त्याच्यापासून दूरच फेकला, पण अम्पायरनं तो वाईड दिला. शिखर धवन व चेतन या निर्णयावर नाराज झाल्याचं दिसलं.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement