SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सरकारचा मोठा निर्णय: बँक बुडाली किंवा बंद पडली, तर 90 दिवसांत मिळणार खातेदारांना पैसे; कसे ते वाचा..

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या (Union Cabinet Meeting) बैठकीमध्ये बुधवारी डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) दुरुस्ती विधेयकास मंजुरी देण्यात आली आहे. कायद्यात ही दुरुस्ती केल्यानंतर खातेधारकांना आणि ठेवीदारांच्या पैशाला आर्थिक सुरक्षा मिळणार आहे. आता या संदर्भातील बिल संसंदेत मांडले जाणार आहे.

बँक बुडाली किंवा बंद झाली तर..

Advertisement

बँक बंद झाल्यानंतर बुडीत निघालेल्या बँकेच्या खातेधारकांना 90 दिवसांमध्ये पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विधेयकाच्या मंजुरीनंतर, बँक बंद झाल्यास किंवा बुडाल्यास 5 लाखांपर्यंतची ग्राहकांची रक्कम सुरक्षित असेल, ती ठेवीदारांना ही रक्कम 90 दिवसांच्या आत मिळेल. (Bank depositors will get an insurance of Rs 5 lakh on their deposits within 90 days)

सध्या ग्राहकांची बँकेत एक लाखापर्यंतची रक्कम सुरक्षित राहत होती. आता ती वाढून 5 लाख रुपयांपर्यंत झाली आहे. या निर्णयामुळे विम्याची मर्यादा वाढेल आणि त्याअंतर्गत 98.3 टक्के बँक खातेधारक संरक्षित होतील. हा निर्णय सर्व बँकासाठी लागू करण्यात आला आहे

Advertisement

लक्ष्मी विलास बँक, पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह बँक (PMC), येस बँक (Yes Bank), भुदरगड पतसंस्था अशा अनेक बँका मागच्या काही वर्षांमध्ये कधी कोणत्या घोटाळ्यामुळे तर कधी थकीत कर्जामुळे बुडाल्या आहेत. विशेष म्हणजे या बँकांमध्ये कित्येक ग्राहकांचा पैसाही बुडाला आहे. पण सध्या अडचणीत सापडलेल्या लोकांना आता दिलासा मिळाला आहे.

काही बँकांच्या दिवाळखोरीनंतर ठेवीदारांना दिलासा:

Advertisement

डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) सुधारणा विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. हे विधेयक संसदेत सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये मांडण्यात येणार आहे. ज्यामुळे कोणतीही बँक बुडाली तर विमा संरक्षणानुसार खातेधारकांना आणि ठेवीदारांना 90 दिवसांच्या आत पैसे मिळणार आहे. हा निर्णय सर्व बँकासाठी लागू असणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी दिली आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement