SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

घरबसल्या 15 लाख रुपये जिंकण्याची संधी..! केंद्र सरकारतर्फे अनोख्या स्पर्धेचे आयोजन, स्पर्धेबाबत सविस्तर माहितीसाठी वाचा..!

घरबसल्या पैसे कमाविण्याची एक चांगली संधी आलीय. मोदी सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी एक अनोखी स्पर्धा आयोजित केली आहे. त्यात तुम्हाला चक्क १५ लाख रुपये जिंकता येणार आहेत. चला तर मग या स्पर्धेबाबत जाणून घेऊ या..!

पायाभूत सुविधांच्या निधीसाठी विशेषतः विकास वित्तीय संस्था (DFI) तयार करण्याची योजना केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर केली होती. ‘नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाइन’ (NIP) या उपक्रमाअंतर्गत 2024 ते 2025 दरम्यान ‘डीएफआय’च्या माध्यमातून 7000 हून अधिक प्रकल्पांवर केंद्र सरकार 111 लाख कोटी रुपये गुंतवणार आहे.

Advertisement

.. तर नव्याने अस्तित्वात येत असलेल्या या संस्थेच्या नामकरणासाठी एक स्पर्धा जाहीर करण्यात आलीय. ‘डीएफआय’साठी योग्य ‘टॅगलाइन’सह (Tagline) लोगो (Logo) डिझाईन करावे लागणार आहेत. त्यासाठी बक्षिसे दिली जाणार आहेत.

Advertisement

‘डीएफआय’चा उद्देश, कार्यप्रणाली आणि हेतू प्रदर्शित करणारे डिझाइन सादर करणाऱ्याच प्रवेशिकाच स्वीकारल्या जाणार आहेत. स्पर्धकांना 15 ऑगस्ट 2021 पर्यंत प्रवेशिका सादर कराव्या लागणार आहेत. त्यातील विजेत्या स्पर्धकाला 15 लाख रुपयांचे बक्षिस जिंकण्याची संधी मिळणार आहे.

संस्थेचे नाव, टॅगलाइन आणि लोगो विकास आर्थिक संस्थेच्या स्थापनेमागील हेतू दर्शविणारे असावेत. ते प्रत्यक्षात व्हर्च्युअल स्वाक्षरीसारखे असले पाहिजे, जे लक्षात ठेवणे आणि उच्चारणे सोपे जायला हवे. थीमशी कनेक्ट होण्याची क्षमता, कल्पकता, उत्स्फूर्तता, नावीन्यतेच्या आधारे प्रवेशिकांचे मूल्यांकन होणार आहे.

Advertisement

स्पर्धकांना नाव, टॅगलाइन आणि लोगो, अशा तीन श्रेणींत रोख बक्षिसे दिली जातील. प्रत्येक श्रेणीत तीन क्रमांक काढले जातील. नाव, लोगो आणि टॅगलाईनच्या प्रत्येक गटात प्रथम विजेत्यास 5 लाख, दुसऱ्या क्रमांकाला 3 लाख, तर तिसऱ्या क्रमांकाला 2 लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे.

असा भाग घेता येणार..
स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रथम mygov.in पोर्टलवर जा. तेथे ‘लॉगिन टू पार्टिसिपेट टॅब’वर क्लिक करा. नंतर नोंदणीचा ​​तपशील भरावा लागेल. नोंदणीनंतर आपल्याला आपली माहिती सबमिट करता येणार आहे.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/Breaking

Advertisement