SpreadIt News | Digital Newspaper

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

0

🗓️ बुधवार, 28 जुलै 2021

मेष (Aries) : मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. दिवस गप्पा-गोष्टींमध्ये घालवा. आपल्या मनातील गुज मोकळेपणाने सांगावे.

Advertisement

वृषभ (Taurus) : व्यापार्‍यांची येणी वसूल होईल. पत्नीशी मतभेदाची शक्यता. मुलांचे विचार जाणून घ्यावेत.

मिथुन (Gemini) : व्यवसायात सरकारी हस्तक्षेप वाढेल. धार्मिक व्यवहारात लक्ष घालाल. किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष करू नये.

Advertisement

कर्क (Cancer): जुनी कामे नव्याने अंगावर येतील. मित्रांच्या भेटीने आनंद होईल. सुरस भोजनाची प्राप्ती होईल.

सिंह (Leo) : तुमच्यातील क्रोधाला खतपाणी घातले जाईल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा लागेल.

Advertisement

कन्या (Virgo): परोपकारातून परमार्थ साधता येईल. कमी श्रमातून अधिक फायद्याचा विचार कराल. गोड बोलण्याला भुलून जाऊ नका.

तूळ (Libra) : आंतरिक सृजनशीलता लाभेल. काहीतरी नवीन करण्याची ऊर्मी दाटून येईल. जवळचे मित्र भेटतील.

Advertisement

वृश्चिक (Scorpio) : भावनेच्या आहारी जाऊ नये. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. फसवणुकीपासून सावध राहावे.

धनु (Sagittarius) : अधिक उत्साहाने कामे कराल. मनमोकळ्या गप्पा मारता येतील. कौटुंबिक जबाबदारीची जाणीव ठेवाल.

Advertisement

मकर (Capricorn) : बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. दिवसभर काहींना-काही काम मागे राहील.

कुंभ (Aquarius) : प्रयत्नात कसूर करून चालणार नाही. जुन्या मित्रांसोबत दिवस मजेत घालवाल. खाण्या-पिण्याची चंगळ राहील.

Advertisement

मीन (Pisces) : आपल्याला सातत्याची गरज भासेल. वेळ आणि काम यांचा मेळ घालावा. स्वत:च्या फायद्याकडे अधिक लक्ष द्याल.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement