SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बँक करतेय घर, दुकाने, प्लॉटचा लिलाव; स्वस्तात घर खरेदी करायचं असेल, तर जाणून घ्या लिलावाची प्रक्रिया..

बँक ऑफ बडोदानं मेगा ऑनलाईन लिलावाच्या माध्यमातून स्वस्त दरात घर खरेदी करण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. आज 28 जुलै रोजी मेगा ई-ऑक्शनचं आयोजन (Mega E Auction to be held on 28th July 2021) केलं आहे. बँक ऑफ बडोदाने ट्विटरद्वारे यासंबंधी माहिती दिली आहे.

बँकेने आयोजित केलेल्या या लिलावामार्फत तुम्ही तुमच्या भविष्यातील स्वप्नातलं घर आज स्वस्त किमतीत खरेदी करू शकता, कारण बँक ऑफ बडोदाने भारतातील विविध ठिकाणांच्या मालमत्ता लिलावी काढल्या आल्या आहेत. अलिशान फ्लॅट्स, ऑफिस स्पेस, लँड स्पेस आणि इंडस्ट्रिअल प्रॉपर्टी अशा मालमत्तांचा या लिलावात समावेश असणार आहे.

Advertisement

महत्वाचं म्हणजे या मालमत्ता खरेदीसाठी जर तुमच्याकडे पुरेसा पैसाही नसला तरी हरकत नाही. जर तुमचं कर्जाविषयीचं रेकॉर्ड अथवा सिबील स्कोअर (CIBIL SCORE) चांगला असेल, तर तुम्हाला ही प्रॉपर्टी (Property) खरेदी करण्यासाठी बँक कर्जही (Bank Loan for Mega E-auction) देणार आहेत. प्रॉपर्टीच्या किंमतीनुसार बँकेकडून हे कर्ज उपलब्ध होणार आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖

Advertisement

कर्ज पाहिजे? मग त्या आधी आपली सिबिल पात्रता लगेच चेक करा

सिबिल पात्रता चेक करण्यासाठी क्लिक करा 👉 https://bit.ly/3dysnSA

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖
Bank of Baroda च्या मेगा ई-ऑक्शनमध्ये कसं सहभागी व्हाल?

▪️ तुम्हाला बँकेच्या ऑनलाईन लिलावात कुठूनही सहभागी होता येतं. ज्या शहरांमध्ये मालमत्ता खरेदी करता येणं शक्य आहे, त्याबद्दल माहीती बँकेच्या वेबसाईटवर मिळेल. 👉 https://www.bankofbaroda.in/property-search.htm  

Advertisement

▪️ वेबसाईटला भेट दिली असता तुम्हाला तिथे तुमचं राज्य निवडावं लागणार आहे.

▪️ तुम्हाला कोणत्या जिल्ह्यांत बँकेने लिलावात ठेवलेल्या मालमत्ता त्याठिकाणी आहेत याची माहिती मिळेल.

Advertisement

▪️ आता संबंधित शहराचं नाव आणि पिन कोड, मालमत्तेचं स्वरूप, पजेशन टाइप, ओनरशिप टाइम आणि किंमत व इतर सर्व माहिती भरून सबमिट करा.

▪️ तुम्हाला तुमच्या पसंतीनुसार ज्या मालमत्तेची माहिती हवी, ती तिथं देण्यात येईल.

Advertisement

तुम्ही बँक ऑफ बडोदाने आयोजित केलेल्या या लिलावात घर किंवा कोणतीही मालमत्ता खरेदी केली तिचा ताबा त्वरित तुम्हाला मिळणार आहे. अशावेळी सर्व कायदेशीर प्रक्रिया बँक राबवत असते. सर्व मालमत्ता कायदेशीरित्या पूर्णपणे वैध असून त्यासंबंधीची सर्व प्रक्रिया बँक पूर्ण करत असते.

IBAPI च्या वेबसाईटवर नोंदणी करावी लागेल

Advertisement

लिलावासाठी बँकांनी IBAPI (इंडियन बँक्स लिलाव तारण मालमत्ता माहिती) असे नाव देण्यात आलेय. त्याच्या वेबसाइटची लिंक https://ibapi.in/ आहे. या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार येत्या 7 दिवसांत 742 निवासी मालमत्ता, 271 व्यावसायिक मालमत्ता आणि 145 औद्योगिक मालमत्तांचा लिलाव होणार आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement