SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मतदार ओळखपत्र हरवलंय? मग तुमचं डिजिटल मतदान ओळखपत्र ‘असं’ करा डाऊनलोड

भारतीय नागरिक म्हटलं की, आपलं नागरिकत्व ठरतं ते आपल्या ओळखपत्रावरून म्हणून मतदार ओळखपत्र (Voter ID Card) हे आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचं आहे. जर आपले कार्डदेखील हरवले असेल तर काळजी करण्याची गरज नाही. आपण मतदान कार्ड पुन्हा डाऊनलोड करू शकता. मतदान करताना मतदार ओळखपत्रसुद्धा जवळ ठेवत असतो. मतदान ओळखपत्र (Voter ID Card) खूप साऱ्या सरकारी योजनांचा (Government Schemes) लाभ घेण्यासाठी लागते. याशिवाय याचा उपयोग इतर सरकारी कामातही होऊ शकतो.

आपलं डिजिटल मतदान ओळखपत्र (Digital Voter ID) ‘असं’ डाऊनलोड करा.

Advertisement

▪️ डिजिटल मतदान ओळखपत्र बनविण्याआधी voterportal.eci.gov.in या वेबसाईटवर नोंदणी (Registration) करा.

▪️ यानंतर तुम्हाला राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल https://www.nvsp.in/account/login वर लॉगिन करा.

Advertisement

▪️ लॉगिन (Login) केल्यावर तेथे तुम्हाला EPIC नंबर किंवा फॉर्म नंबर द्यावा लागणार आहे. आता तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावर एक ओटीपी येईल.

▪️ तुम्ही आता वेब पोर्टलवर (Web Portal) ओटीपी (OTP) टाका. मग तुम्हाला बर्‍याच वेबसाईट वरच्या बाजूला दिसतील, तुम्हाला ‘डाऊनलोड ई-ईपीआयसी’ वर क्लिक करावे लागेल.

Advertisement

▪️ मग काय झालं तर डाउनलोड! तुमचं डिजिटल मतदार आयडी पीडीएफ (PDF) स्वरूपात डाऊनलोड होईल. तुम्ही तुमचं डिजीटल वोटर आयडी डिजीलॉकर (Digilocker) मध्ये सेव्ह करू शकता.

काही आवश्यक गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं:

Advertisement

रंगीबेरंगी आणि प्लास्टिक मतदार ओळखपत्र: तुम्हाला रंगीबेरंगी आणि प्लास्टिक मतदार ओळखपत्रसुद्धा बनवू शकता. आपण घरबसल्या त्यासाठी अर्ज करू शकतो. हे ओळखपत्र आकाराने लहान असतं आणि त्याची छपाई व गुणवत्ता या दोन्ही गोष्टी चांगल्या आहेत. तुम्हाला कार्ड बनविण्यासाठी केवळ 30 रुपये खर्च येईल. याशिवाय व्होटर आयडी (Voter ID) संबंधित कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी टोल फ्री क्रमांकावर 1950 वर संपर्क साधू शकता.

मोबाईल नंबर अपडेट करून घेणे आवश्यक: ज्या मतदारांचा मोबाईल नंबर निवडणूक आयोगाकडे नोंदवला गेला असेल, त्यांनाच डिजीटल वोटर कार्ड मिळणार आहे. समजा जर संबंधित मतदाराचा मोबाईल नंबर निवडणूक आयोगाकडे रजिस्टर नसला, तर त्यांना मोबाईल नंबर निवडणूक आयोगाकडून पडताळणी करुन घ्यावा लागेल.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement