SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमांत मोठा बदल, आता किती वेळा फ्रि पैसे काढता येणार, जाणून घेण्यासाठी वाचा..!

एटीएम वापरकर्त्यांसाठी महत्वपूर्ण बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एटीएमद्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहारांबाबतच्या नियमांत मोठा बदल केलाय. रिझर्व्ह बॅंकेने जवळपास 9 वर्षांनंतर एटीएम व्यवहारांसाठी ‘इंटरचेंज फी’ वाढविली आहे.

संसदेच्या चालू पावसाळी अधिवेशनात उत्तर प्रदेशमधील अमरोहाचे खासदार कुंवर दानिश अली यांनी एटीएममधून केल्या जाणाऱ्या व्यवहाराबाबत प्रश्न उपस्थित केला होता. एटीएम व्यवहारांची कमाल मर्यादा ओलांडल्यानंतर ग्राहकांना किती पैसे द्यावे लागतील, असे त्यांनी विचारले होते.

Advertisement

तसेच, नियमांत असा काही बदल केला असल्यास, डिजिटल ग्राहक नसलेल्या ग्रामीण भागातील बॅंकेच्या खातेदारांवर अतिरिक्त भार तर पडणार नाही, हा अतिरिक्त भार कमी करण्यासाठी सरकारकडे काही प्रस्ताव आहे का? असा सवाल खासदार कुंवर दानिश अली यांनी केला होता.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत किशनराव कराड यांनी या प्रश्नाला उत्तर दिले. त्यांनी सांगितले, की 1 जानेवारी 2022 पासून बँकांना ग्राहकांकडून 21 रुपये घेण्यास ‘आरबीआय’ने परवानगी दिली आहे. सध्या बँका जास्तीत जास्त 20 रुपये घेत असल्याचे ते म्हणाले.

Advertisement

बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या बँकेच्या एटीएममधून 5 वेळा पैसे काढता येतील. आपल्या बँकेच्या एटीएममधून विनारोकड व्यवहारासाठी कोणतीही मर्यादा नाही. इतर बँकांच्या एटीएमच्या वापरावर मात्र मर्यादा घालण्यात आल्या आहेत.

आपण 3 ते 5 वेळा इतर बॅंकेचे एटीएम वापरु शकतो. त्यात विना-रोकड व्यवहाराचाही समावेश आहे.
दिल्ली, मुंबई, कोलकाता, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई यांसारख्या मेट्रो शहरांत इतर बँकांच्या एटीएममधून 3 वेळा पैसे काढता येतील.

Advertisement

मेट्रो शहरे वगळता इतर बँकेच्या एटीएमचा 5 वेळा देशात वापर करता येईल. पैसे मागे घ्या किंवा चौकशी करा किंवा पैसे हस्तांतरित करा. सर्व रोख आणि विना-रोकड व्यवहारांसाठी 5 वेळांची मर्यादा आहे.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/Breaking

Advertisement