SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकिंग : पुराचा फटका बसलेल्या महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी घोषणा; कृषिमंत्र्यांची संसदेत माहिती

महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टी भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढले. अनेकांचे संसार उघड्यावर आले. शेतीलाही फटका बसला. पुराचे पाणी थेट शेतात घुसल्याने पिकेही वाहून गेली. काही ठिकाणी पाणी साचून राहिल्याने कोवळी पिके जागेवरच सडली.

मुसळधार पावसामुळे उद्धवस्त झालेल्या शेतकऱ्याच्या मदतीसाठी अखेर मोदी सरकार धावले आहे. केंद्राने पूरग्रस्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सुमारे 700 कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी दिली.

Advertisement

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना, कृषिमंत्री तोमर यांनी ही घोषणा केली.

ते म्हणाले, की “महाराष्ट्रात आलेल्या पूरामुळे, विशेषत: शेतकऱ्यांच्या नुकसानीचा सखोल अहवाल मिळाला असून, त्याचं सखोल विश्लेषण करण्यात आलं. पूरातील पीडित शेतकऱ्यांसाठी गृह मंत्रालयाने तातडीची मदत म्हणून ७०० कोटी रुपये मंजूर केले आहेत.”

Advertisement

राज्य सरकारही विशेष पॅकेजची घोषणा करणार ?
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाची उद्या (बुधवारी) दुपारी साडेबारा वाजता सह्याद्री अतिथीगृहात बैठक होत आहे. तीत राज्यातील पूरग्रस्तांसाठी विशेष पॅकेजची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. बैठकीत नुकसानीचे सादरीकरण केले जाणार असून, प्रत्येक विभागाकडून नुकसानीची माहिती घेतली जाणार आहे.

सुमारे 8 हजार कोटी रुपयांची आवश्यकता
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि विदर्भातील अकोला, अमरावती जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठे नुकसान झाले आहे. पिकांची नुकसानभरपाई, रस्ते, वाहून गेलेले पूल, वीजयंत्रणा उभी करणे, दरडी कोसळलेल्या गावांचे पुनर्वसन करावे लागणार आहे.

Advertisement

राज्यातील 8 जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सुमारे 8 हजार कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचा प्राथमिक अंदाज राज्य सरकारने वर्तविला आहे. त्यामुळे उद्याच्या (ता. 28) बैठकीत राज्य सरकार काय निर्णय घेते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/Breaking

Advertisement