SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अकरावी ‘सीईटी’साठी ऑनलाईन नोंदणी सुरु..! वेबसाईटची माहिती, प्रश्नपत्रिकेचे स्वरुप जाणून घेण्यासाठी वाचा..!

दहावीचा निकाल जाहीर होताच, राज्य मंडळाने २० जुलै रोजी शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ‘सीईटी’ परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र, त्यात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे २१ जुलैला ही अर्जनोंदणी प्रक्रिया बंद करण्याची वेळ आली.

दरम्यान, आता पाच दिवसांनी अर्ज नोंदणीसाठी राज्य मंडळाने नव्याने यंत्रणा विकसित केली असून, विद्यार्थ्यांना आता नव्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे.

Advertisement

राज्य मंडळाकडे नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना आज (ता. २६) दुपारी तीन वाजेपासून ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत, तर अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना बुधवारपासून (ता. २८) अर्ज करता येतील, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले.

अकरावी प्रवेशासाठी होणारी ही परीक्षा विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे ऐच्छिक असून, ती ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित ही परीक्षा असेल. विद्यार्थ्यांना २ ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत आहे.

Advertisement

परीक्षेसाठी यापूर्वी २० व २१ जुलैदरम्यान नोंदणी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना अर्जक्रमांक, नोंदविलेला मोबाईल क्रमांक टाकून या संकेस्थळावर अर्जाची स्थिती पाहता येईल. याआधी पूर्ण अर्ज सादर केला असल्यास विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने अर्ज करण्याची गरज नाही. मात्र, अर्जाची प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्यास विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज करावा लागेल.

राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांकडून या परीक्षेसाठी कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. मात्र, अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना परीक्षाशुल्क आकारले जाणार आहे. त्यासाठी पेमेंट गेटवेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अशा विद्यार्थ्यांना बुधवारपासून (ता. २८) परीक्षेसाठी अर्ज करता येईल.

Advertisement

अर्ज सादर करण्यासाठी संकेतस्थळ- https://cet.11thadmission.org.in.

परीक्षेसाठी १०० गुणांची एकच प्रश्नपत्रिका असेल, त्यासाठी दोन तासांचा अवधी दिला जाईल. प्रश्नपत्रिका आठ माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल. सेमी इंग्रजी माध्यमाची निवड केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी अर्जात निश्चित केलेल्या इंग्रजी आणि इतर माध्यमाचा विचार करून प्रश्नपत्रिका पुरविण्यात येईल.

Advertisement

प्रश्नपत्रिकेचे स्वरूप 

विषयनिहाय गुण
इंग्रजी : २५ गुण
गणित  (भाग एक आणि दोन) : २५
विज्ञान आणि तंत्रज्ञान (भाग एक आणि दोन) : २५
सामाजिक शास्त्रे (इतिहास, राज्यशास्त्र, भुगोल : २५
एकूण : १००

Advertisement

वेबसाईट बंदच
दरम्यान, सीईटी परीक्षेची नोंदणी आज दुपारी तीन वाजेपासून सुरु करणार असल्याचे सांगण्यात आलं असलं, तरी अद्यापही वेबसाईट बंद असल्याचं समजतंय. अकरावी प्रवेशाची सीईटी परीक्षा 21 ऑगस्ट रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/Breaking

Advertisement