SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी..! मोबाईल सेवेप्रमाणे वीज कंपनीही बदलता येणार..! केंद्र सरकारच्या नव्या विधेयकात काय म्हटलेय पाहा..?

आपल्याला एखाद्या मोबाईल कंपनीची सेवा आवडली नाही, तर आपण दुसऱ्या कंपनीकडे वळतो. त्यातून स्पर्धा वाढून ग्राहकांनी चांगली सेवा मिळते. आता वीज ग्राहकांनाही अशाच प्रकारे त्यांची कंपनी बदलण्याचा पर्याय मिळणार आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळ लवकरच विद्युत (संशोधन) विधयेक-२०२१ मंजूर करणार असल्याचे समजते. हे विधेयक मंजूर झाल्यास, ग्राहकांना मोबाईल सेवांप्रमाणेच त्यांच्या आवडीची वीज सेवा पुरवठादार कंपनी निवडण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे.

Advertisement

केंद्रीय मंत्रिमंडळ पुढील काही दिवसांतच वीज (दुरुस्ती) विधेयक 2021 सभागृहाच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवणार आहे. हे विधेयक संसदेच्या पावसाळी अधिवेशनातच मंजूर करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. 13 ऑगस्ट 2021 रोजी पावसाळी अधिवेशन संपत असल्याने त्याआधीच हे विधेयक मंजूर होऊ शकते.

केंद्र सरकारने संसदेच्या या अधिवेशनात 17 नवीन विधेयके प्रस्तावित केली आहेत. त्यात वीज (दुरुस्ती) विधेयकाचाही समावेश असल्याचे 12 जुलै 2021 रोजी जारी झालेल्या लोकसभेच्या बुलेटिनमध्ये नमूद केलेले आहे. या विधेयकात वीज ग्राहकांचे हक्क आणि कर्तव्येसुद्धा ठरविली आहेत.

Advertisement

विद्यमान वीज वितरण कंपनीच्या सेवेबाबत समाधानी नसल्यास, आपणास ती कंपनी बदलण्याचा अधिकार मिळणार आहे. जुनी कंपनी सोडून वीजपुरवठ्यासाठी आपल्या आवडीची वीज कंपनी निवडण्याचा अधिकार मिळणार आहे.

एक कंपनी निवडण्याचा पर्याय मिळणार
मोदी सरकारचे हे विधेयक अस्तित्त्वात आल्यानंतर खासगी कंपन्यांना वीज वितरण क्षेत्रात प्रवेश करण्याचा मार्ग खुला होणार आहे. कारण, परवाना घेण्याची गरज दूर होऊन स्पर्धेतही वाढ होईल. त्याचा थेट वीज ग्राहकांना फायदा होईल, कारण त्यांच्याकडे वीज वितरण कंपनी निवडण्यासाठी बरेच पर्याय असतील.

Advertisement

सध्या वीज वितरण क्षेत्रावर केवळ काही सरकारी आणि खासगी कंपन्यांचे वर्चस्व आहे. वीज ग्राहकांना दुसरा मार्ग नसल्याने ते तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत आहेत. हे विधेयक आल्यानंतर ग्राहकांना बर्‍याच वीज कंपन्यांमधून एक कंपनी निवडण्याचा पर्याय असेल.

वीज कपात केल्यास भरपाई द्यावी लागणार
विधेयकात ग्राहकांना अधिक सामर्थ्यवान बनविले आहे. वीज कपात करण्यापूर्वी वीज कंपनीला ग्राहकांना माहिती द्यावी लागणार आहे. ठरलेल्या मुदतीच्या पलीकडे वीज कपात झाल्यास, ग्राहकांना भरपाई द्यावी लागणार आहे.

Advertisement

वीज वितरण व्यवसाय सुरु करण्यासाठी केंद्र सरकारच्या पात्रता अटींचे पालन करावे लागेल. वीज वितरण सुरू करण्यापूर्वी संबंधित आयोगाकडे 60 दिवसांत कंपनीची नोंदणी करावी लागेल. कंपनी पात्र न ठरल्यास नोंदणी रद्द होणार आहे.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/Breaking

Advertisement