SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

स्वस्तात मस्त..! ‘नोकिया’चा 4G मोबाईल लाॅंच, कमी किंमतीत भरमसाठ वैशिष्ट्ये पाहून तोंडात बोटे घालाल..!

जगातील सर्वात विश्वसनिय ब्रॅंडपैकी एक म्हणजे ‘नोकिया’ (Nokia). काळाच्या ओघात हा ब्रॅंड काहीसा मागे पडला होता. मात्र, लोकांच्या मनात ‘नोकिया’बद्दल कायम आपलेपणाची भावना राहिलीय.

‘नोकिया’ने आता पुन्हा एकदा गगनभरारी घेण्याचे ठरविले असून, त्यासाठी सर्वसामान्यांना परवडेल, असा स्वस्त नि मस्त मोबाईल लॉन्च केलाय. ‘Nokia 110 4G’ असे या मोबाईलचे नाव आहे. हा मोबाईल Jio Phone Next ला नक्कीच टक्कर देईल, असे बोलले जात आहे.

Advertisement

बाजारात Nokia 110 4G हा मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. या मोबाईलमध्ये HD Voice Call, तसेच 4G कनेक्टीव्हीटी मिळणार आहे. मोबाईलच्या बाजूच्या भागात मोठ्या आकारातील बटण दिले असल्याने हा मोबाईल सहज वापरता येणार आहे.

Nokia 110 4G ची वैशिष्ट्ये
बॅक कॅमेरा, टॉर्च, इंटरनेट, वायरलेस FM सारखी भन्नाट फीचर्स Nokia 110 4G या मोबाईलमध्ये आहेत. शिवाय MP3 प्लेअर आणि 3  in 1 स्पीकर व गेम्सही आहेत. ‘नोकिया’ची बॅटरी नेहमीच दमदार राहिलीय. या मोबाईलचीही ‘बॅटरी लाईफ’ चांगली आहे.

Advertisement

‘Nokia 110 4G’ ची किंमत
ई-कॉमर्स वेबसाईटवरुन हा Nokia 110 4G मोबाईल खरेदी करता येणार आहे. Nokia.com/Phones या अधिकृत वेबसाईटवरही तो बूक करता येईल. मोबाईलची किंमत अवघी 2799 रुपये आहे. Yellow, Black आणि Aqua या तीन रंगामध्ये हा मोबाईल खरेदीसाठी उपलब्ध आहे.

मोबाईलची आणखी वैशिष्ट्ये
– डिस्प्ले- 1.8 इंच QQVGA
– मोबाईलमध्ये ड्युअल सीमकार्ड (Nano Sim Slot) आणि Micro USB पोर्टही आहे.
– बॅटरी- 1020mAh (स्टॅंड बायवर बॅटरी 12 दिवस पुरेल, असा कंपनीचा दावा आहे).

Advertisement

– स्टोअरेज- 48 MB इंटरनल (मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने 32 जीबीपर्यंत स्टोअरेज वाढविता येईल)
– रॅम – 128MB RAM.
– ऑपरेटींग सिस्टम – Unisoc T107 CPU और Series 30+

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/impnews

Advertisement