कोरोनातून देश सावरत असताना, नोकरीच्या संधीही उपलब्ध होत आहेत. भारतीय रेल्वेने नुकतीच काही पदांसाठी भरती केली जाणार असल्याचे जाहीर केले आहे.
विशेष म्हणजे, त्यासाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नसून, फक्त मुलाखतीद्वारे (interview) नोकरभरती केली जाणार आहे. येत्या 27 व 28 जुलैला ‘वॉक-इन इंटरव्ह्यू’द्वारे ही पदभरती होणार असल्याची माहिती रेल्वेच्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे.
विविध पदांवर निवड होणाऱ्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार दरमहा 67,700 रुपये ते 2,08,700 रुपये दरमहा वेतन मिळणार आहे. शिवाय इतर भत्ते वेगळे मिळणार आहेत.
पदनिहाय रिक्त जागा
एनेस्थीशिया – 1
ईएनटी – 1
जनरल मेडिसिन – 12
जनरल सर्जरी- 6
मायक्रोबायोलॉजी – 1
स्त्रीरोग तज्ज्ञ – 1
(वरील पदांसाठी 27 तारखेपासून मुलाखतींना सुरुवात होणार)
पेडियाट्रिक्स – 1 पद
रेडियोलॉजी – 2 पदे
(या पदांसाठी 28 जुलै मुलाखती होतील)
शैक्षणिक पात्रता
वरील पदांसाठी अर्ज करण्यास पात्र ठरण्यासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थांमधून पदवी घेतलेली असणे आवश्यक आहे. तसेच कमीत कमी 3 वर्षांचा अनुभव असावा. याबाबत नोटीफिकेशनमध्ये सविस्तर माहिती दिली आहे.
वयोमर्यादा
जनरल कॅटेगिरी – 40 वर्षे
ओबीसी – 43 वर्षे
एससी, एसटी – 45 वर्षे
पगार
निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार दरमहा 67,700 रुपये ते 2,08,700 रुपये वेतन दिले जाणार आहे. शिवाय त्याला जोडून इतर भत्ते वेगळे मिळणार आहेत.