SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मीराबाई चानूला पिज्जा खाण्याची इच्छा..! ‘डाॅमिनोज’ने दिली भन्नाट ऑफर, पाहा नेमकी काय ऑफर दिलीय..?

टोकियो ऑलिम्पिक-2021 मध्ये भारतीय महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकून इतिहास रचला. भारताला मिळालेले हे आतापर्यंतचे पहिलेच पदक आहे.

मीराबाईच्या यशामुळे भारताची वेटलिफ्टिंगमधील पदकाची 21 वर्षांची प्रतीक्षा संपली. मीराबाई चानूने 49 किलो वजनीगटात ‘स्नॅच अँड क्लीन अँड जर्क’ फेऱ्यांमध्ये एकूण 202 किलो वजन उचलून हे पदक जिंकले.

Advertisement

सध्या सोशल मीडियावर मीराबाई चानूवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, या मोठ्या विजयानंतर मीराबाई चानू हिने एका मुलाखतीत पिझ्झा खाण्याची इच्छा व्यक्त केली होती. याबाबत माहिती मिळताच, ‘डॉमिनोज’ने (Dominos Pizza) मीराबाई चानू हिला आयुष्यभरासाठी (लाइफटाईम) फ्री पिझ्झा देण्याची घोषणा केलीय.

Advertisement

‘डॉमिनोज’ने ट्वीटमध्ये म्हटलेय, की ‘मीराबाई चानूने म्हटलं आणि आम्ही ऐकलं. पिझ्झा खाण्यासाठी मीराबाई चानूने कोणतीही वाट पाहावी लागू नये, अशी आमची इच्छा आहे. त्यामुळेच आम्ही तिला लाईफटाईम मोफत डॉमिनोज पिझ्झा देत आहोत.’

दरम्यान, ‘डॉमिनोज’च्या या निर्णयामुळे त्यांचे कौतुक होत आहे. मीराबाईच्या आधी 2000 मध्ये सिडनी ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये कर्णम मल्लेश्वरीने देशासाठी कांस्यपदक जिंकले होते. 21 वर्षांनंतर आता मीराबाई चानूने रौप्य पदक जिंकले आहे.

Advertisement

आपल्या यशानंतर मीराबाई चानूने ट्विटरवर एक व्हिडीओ अपलोड करीत चाहत्यांचे आभार मानले आहेत. व्हिडीओत तिनं म्हटलंय, की ‘टोकियो ऑलिम्पिकमध्ये मी पहिलं पदक जिंकलं. सर्व भारतीयांनी माझ्यासाठी प्रार्थना केली. मी माझं पहिलं पदक देशवासियांना समर्पित करतेय..’

Advertisement

मीराबाई चानूनं पुढे म्हटलं, की, “सर्व देशवासियांमुळे मी टोकियो ऑलिम्पिकमध्ये एवढं मोठ यश मिळवू शकले. मी सर्वांचे आभार मानते..”

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/Breaking

Advertisement