SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मोक्कार मोबाईल वापरास बसणार चाप..! सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी नवा फतवा..! आदेशात काय म्हटलेय पाहा..!

राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ‘ड्रेस कोड’बाबतचा आदेश दिला होता. शासकीय कार्यालयात येताना, कर्मचाऱ्यांनी एकाच गणवेशात असणे बंधनकारक केले होते. राज्य सरकारच्या या निर्णयावर कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

दरम्यान, आता राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आदेश जारी केला आहे. त्यानुसार शासकीय कार्यालयात मोबाईलचा वापर कसा करायचा, याबाबत राज्य सरकारने परिपत्रक काढले असून, अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्याचे पालन करावे लागणार आहे.

Advertisement

सध्याच्या काळात मोबाईलचा सर्रास वापर होताना दिसतो. त्यामुळे शासकीय कामातही गतीमानता आली आहे. मात्र, त्याचे दुष्परिणामही दिसत आहेत.

काही शासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी सतत मोबाईलवर अॅक्टिव्ह असतात. हातातील कामे सोडून सोशल मीडियावर किंवा मोबाईलवर गेम खेळत बसतात. अगदी महत्वाच्या मीटिंगमध्येही अधिकारी-कर्मचार्‍यांकडून अपेक्षित शिष्टाचार पाळला जात नाही.

Advertisement

अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अशा वर्तणुकीमुळे शासनाची प्रतिमा मलीन होते आहे. त्यामुळे ड्रेसकोडप्रमाणेच मोबाईल वापराबाबत सामान्य प्रशासन विभागाने अधिकारी-कर्माचाऱ्यांना आदेश काढून सूचना दिल्या आहेत.

मोबाईल वापरासंदर्भात सूचना
– कार्यालयीन कामकाजासाठी दूरध्वनीचा वापर करताना, कार्यालयातील दूरध्वनीचाच (लँडलाईन) वापर करावा.
– कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामकाजासाठीच अगदी आवश्यक असेल, तरच मोबाईल वापरता येईल.

Advertisement

– मोबाईलवर बोलताना सौजन्यपूर्ण भाषेचा वापर करावा. इतरांच्या उपस्थितीची जाणीव ठेवावी.
– मोबाईलवर सौम्य आवाजात बोलावे, वाद घालू नये, तसेच असंसदीय भाषेचा वापर करु नये.

– कार्यालयीन कामासाठी मोबाईलचा वापर करताना टेक्स् मेसजचा शक्यतो वापर करावा. मोबाईलवर कमीत कमी संवाद साधावा.
– लोकप्रतिनिधी वा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन कॉल्सना तात्काळ उत्तर द्यावे.

Advertisement

– मोबाईलवर कार्यालयीन कामकाजासाठी समाजमाध्यमांचा (सोशल मीडिया) वापर करताना वेळेचे, भाषेचे तारतम्य पाळावे.
– अत्यावश्यक वैयक्तिक कॉल कक्षाच्या बाहेर जाऊन घ्यावेत.

– वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मीटिंगच्या वेळी मोबाईल सायलेंट किंवा व्हायब्रेटरवर ठेवावा. त्यावेळी एसएमएस तपासणे, एअर फोन वापरणे वगैरे टाळावे.

Advertisement

– मीटिंग चालू असताना मोबाईलचा वापर करु नये.
– कार्यालयीन कामकाजासाठी दौऱ्यावर असताना मोबाईल बंद ठेवू नये.

दरम्यान, शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ड्रेसकोडचा नियम लागू झाल्यावर नाराजी व्यक्त केली होती. आता मोबाईल वापराबाबतच्या आदेशाची किती अंमलबजावणी होते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/impnews

Advertisement