SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ओटीटी प्लॅटफॉर्मवर शिल्पा शेट्टीच्या ‘हंगामा 2’ सोबतच या आठवड्यात ‘हे’ चित्रपट व वेबसीरिज येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT) मागच्या काही दिवसात जबरदस्त मनोरंजनाचा आस्वाद घेत आला आहात. असता शनिवार व रविवारी देखील मनोरंजनाची मोठी मेजवानी असणार आहे. या आठवड्याच्या शेवटीदेखील अनेक चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत.

जाणून घेऊया कोणते चित्रपट & वेबसिरीज ( Web Series) प्रदर्शित होणार

Advertisement

1) हंगामा 2

प्रेक्षकांमध्ये हास्याची लाट निर्माण करण्यासाठी हंगामाच्या यशानंतर अजून एकदा प्रियदर्शन याच्या दिग्दर्शनाच्या ‘हंगामा’ (Hungama Movie) चित्रपटाचा सिक्वेल शुक्रवारी (23 जुलै) प्रदर्शित झाला आहे. या वेळी चित्रपटाची कास्ट मागील वेळेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. सध्या राज कुंद्रा प्रकरणामुळे चर्चेत येत असलेल्या ‘हंगामा 2’ (Hungama 2) मध्ये त्याची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचाही समावेश आहे. परेश रावल, मीजान जाफरी आणि प्रणिता सुभाष ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपण डिस्ने प्लस हॉटस्टारवर हा चित्रपट पाहू शकता.

Advertisement

2) ‘चुट्ज़पाह’

Advertisement

अरिशय रंजक सीरीज म्हणून ‘चुट्ज़पाह’ ही सिरीज ओळखली जाऊ लागली आहे. यात 5 वेगवेगळ्या कथा दाखवल्या गेल्या आहेत. सोशल मीडिया लाईफ आणि इंटरनेट संस्कृतीची सांगड घालणार आहे. डिजिटल पिढीची काळी बाजू यामध्ये दिसते. सिमरप्रीत सिंग यांचं दिग्दर्शन असलेल्या या वेबसिरीजमध्ये वरुण शर्मा, मनजोत सिंह, एलनाझ नोरोजी, गौतम मेहरा असे अनेक कलाकार दिसणार आहेत. तुम्ही सोनी लिव्हवर (SonyLiv)ही मालिका पाहू शकता.

Advertisement

3) फील लाईक इश्क

नेटिफ्लिक्सवर (Netflix) तुम्ही ही सीरीज पाहू शकता. फील लाईक इश्क या वेबसीरीजमध्ये आपल्याला सहा प्रकारच्या वेगवेगळ्या कथा पाहायला मिळतील. या वेबमालिकेत प्रेम, राग, कॉमेडी, भावनिक, पश्चात्ताप असं सगळं काही आहे. तरुण वर्ग स्वत:ला या सीरीजच्या कथेशी जोडू शकतो, अशी ही कथा आहे. यात राधिका मदन, अमोल पराशर, रोहित सराफ, संगीता भट्टाचार्य असे कलाकार आहेत.

Advertisement

 

Advertisement

4) होस्टल डेज़ सीझन 2

‘हॉस्टेल डेज’ (Hostel Days Season 2) या सिरीजचा पहिला सीझन प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता. इंजिनिअरिंग कॉलेजच्या होस्टेलमध्ये जे काही घडतं ते आयुष्य खरं काय असतं, ते या सीरीजमध्ये दाखवलं जाणार आहे. पहिल्या सीझनमध्ये 4 मित्रांची कथा दाखवली गेली आहे आणि आता दुसर्‍या सत्रात त्यांचा सिनिअर झाल्यानंतर पुढचा प्रवास सुरु कसा होतो हे दाखवलं जाईल. या वेबसीरीजमध्ये आदर्श गौरव, एहसान चन्ना, आयुषी गुप्ता यांचा अभिनय पाहायला मिळणार आहे. आपण ही सीरीज अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.

Advertisement

 

Advertisement

5) 14 फेरे

अल्पावधीतच प्रसिद्धी मिळवलेल्या विक्रांत मेस्सीचा (Vikrant Messi) चित्रपट ’14 फेरे’ (14 Fere) हा चित्रपट शुक्रवारी (23 जुलै) प्रदर्शित झाला आहे. कृती खरबंडा त्याची सहनायिका आहे. विक्रांत मेस्सीनी पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. हा एक कॉमेडी चित्रपट आहे, मनोरंजन तर आहेच पण यासोबतच एक चांगला संदेश देखील मिळतो. देवंशु कुमार दिग्दर्शित हा चित्रपट तुम्ही ‘झी 5’ (ZEE5) वर पाहू शकता.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement