SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

जाणून घ्या: ‘गुरुपौर्णिमा’ का व कधीपासून साजरी केली जाते?

भारतीयांच्या जीवनात गुरुचे स्थान हे सर्वोच्च असल्याचं समजलं जातं. कोणतीही व्यक्ती कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी एखाद्याला गुरू मानत असते. एखाद्या मातीच्या गोळ्याला आकार द्यावा अशा पद्धतीने गुरु आपल्या शिष्याला घडवत असतो.

आपल्या विद्यार्थ्याच्या जीवनात महत्वाचे बदल गुरू घडवत असतात. गुरुचे आभार मानून वंदन करून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारतात गुरुपौर्णिमा (Guru Purnima) साजरी करण्यात येते.

Advertisement

‘महाभारत’ या महाकाव्याचे निर्माते असलेल्या व्यास ऋषींनी केलेल्या अफाट कार्याची आठवण म्हणून भारतात गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. आज सकाळी 10 वाजून 43 मिनीटांनी सुरु होणारी गुरु पौर्णिमा 24 जुलै 2021 ला सकाळी संपणार आहे.

भारतात गुरु-शिष्य परंपरेला खूप मोठी परंपरा आहे. गुरुपौर्णिमाचा संदर्भ प्राचीन भारताच्या इतिहासात सापडतो. पुराणशास्त्राच्या दाखल्यानुसार, आषाढी पौर्णिमेच्या दिवशी महाभारत महाकाव्याचे निर्माता व्यास ऋषींनी आपल्या शिष्यांना आणि इतर ऋषींना वेद आणि पुराणांचे ज्ञान दिलं होतं. याच दिवसाचे स्मरण म्हणून गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.

Advertisement

भारतात गुरुला ब्रम्हा, विष्णू, महेशाचं रुप समजलं जातं. गुरु हा साक्षात परब्रमह्म असल्याचं सांगितलं जातं. भारतातील जवळजवळ सर्वच शाळांमध्ये गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. यंदाच्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 23 जुलैला गुरुपौर्णिमा साजरी करण्यासाठी नियमांचं पालन करावं लागणार आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते, त्या दिवशी विद्यार्थी आपल्या गुरुप्रति सन्मान व्यक्त करून आदर व्यक्त करतात.

व्यास ऋषींनी महाभारताची निर्मिती करण्यासोबतच इतर सहा शास्त्रांची आणि अठरा पुराणांचीही निर्मिती केली होती. अति पुराण काळापासून त्यांच्या या निर्मितीचे ज्ञान भारतीय विद्यार्थ्यांना देण्यात येतं. याशिवाय व्यास ऋषींनी श्रीमद् भागवत पुराणाची निर्मिती केली आहे. श्रीमद् भागवत पुराणामध्ये त्यांनी विष्णूच्या अवतारांचे सुरेख वर्णन केलं आहे. व्यास ऋषींनी शिष्यांना या सर्वांचे ज्ञान पौर्णिमेच्या दिवशी दिलं होतं. त्याचे स्मरण म्हणून या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असंही म्हटलं जातं. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.

Advertisement

( महत्वाचं! – हा लेख सर्वसामान्य प्राप्त माहीतीवर आधारित आहे)

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement