SpreadIt News | Digital Newspaper

स्वीस बॅंकेत मागील वर्षी ठेवला रेकाॅर्डब्रेक काळा पैसा, तो परत आणण्यासाठी मोदी सरकारने काय केलंय, जाणून घेण्यासाठी वाचा..!

भारतातील अनेक धनाढ्यांनी करचुकवेगिरी करुन स्वीस बॅंकेत मोठ्या प्रमाणात काळा पैसा दडवून ठेवल्याचे नेहमीच बोलले जाते. या मुद्द्यावरुनच देशात एके काळी रान पेटले होते. त्यामुळे अगदी देशात तख्तबदल झाला. मात्र, स्वीस बॅंकेतील काळ्या पैशांचे पुढे काय झाले, हा प्रश्न तसाच राहिला.

स्वित्झलॅंडमधील स्वीस बॅंकेला ‘टॅक्स हेवन’ म्हणून ओळखले जाते. कर वाचविण्यासाठी अनेक जण या बॅंकेत आपला पैसा ठेवतात. त्यात भारतीय नागरिक आणि संस्थांची संख्याही मोठी आहे.

Advertisement

दरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी हाच मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला. स्वीस बॅंकेत खरंच काळा पैसा आहे का, किती आहे आणि गेल्या वर्षभरात त्यात कितीने वाढ झाली, तसेच हा पैसा भारतात आणण्यासाठी मोदी सरकारने काय केले, याबाबत विरोधकांनी विचारणा केली.

विरोधकांच्या प्रश्नाला नूतन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी उत्तर दिले.  स्वीस बॅंकेत पैसा ठेवणाऱ्यांची खाती स्विर्त्झलॅंडमध्येच असतील असे नाही, तर ते स्वीस बॅंकेच्या परदेशातील शाखांमध्येही असू शकतात, असे स्पष्टीकरण स्विर्त्झलॅंडने भारताच्या वित्त मंत्रालयाकडे दिले आहे.

Advertisement

२०२० मध्ये भारतीय नागरिक व संस्थांनी स्वीस बॅंकेत तब्बल २०,७०० कोटी रुपये ठेवल्याची माहिती स्वीस नॅशनल बॅंकेने भारत सरकारला दिली. हा मागील १३ वर्षांतील रेकाॅर्ड आहे.

स्वीस बॅंकेत भारतीय नागरिक व संस्थांनी ठेवलेल्या पैशांची माहिती जाणून घेण्यासाठी गेल्या महिन्यात वित्त मंत्रालयाने स्वीस प्राधिकरणाकडे विचारणा केली होती. स्विर्त्झलॅंडसोबत करार करुन याबाबत सविस्तर माहिती मिळविण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याचे राज्यमंत्री चौधरी यांनी सांगितले.

Advertisement

भारतात २०१५ मध्ये काळा पैसा विरोधी कायदा करण्यात आला. त्या अंतर्गत परदेशातील बॅंकांमध्ये दडवून ठेवलेला पैसा भारतात आणला जाऊ शकतो. शिवाय काळ्या पैशांचा तपास करण्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या दोन माजी न्यायाधिशांची समिती नेमल्याचेही चौधरी यांनी सांगितले.

काळ्या पैशांची माहिती मिळविण्यासाठी स्विर्त्झलॅंडच नाही, तर इतर कोणत्याही देशासोबत भारत सरकार द्विपक्षीय करार करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचेही मंत्री चौधरी यांनी सांगितले.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/impnews

Advertisement