SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

राज कुंद्रा प्रकरणात नवा ‘ट्विस्ट’..! अटक टाळण्यासाठी राजने मुंबई क्राइम ब्रॅंचला मोठ्या रकमेची लाच दिल्याचा सनसनाटी आरोप.. पाहा कोणी केलाय हा आरोप..?

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला पॉर्नोग्राफी प्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला 23 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत असताना, आता आणखी एक ‘ट्विस्ट’ आला आहे.

या प्रकरणातल्या एका आरोपीने मोठा खुलासा केलाय. या प्रकरणात अटक टाळण्यासाठी राज कुंद्रा याने मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रॅंचला 25 लाख रुपयांची लाच दिल्याचा दावा या आरोपीने केला आहे. मात्र, याबाबत मुंबई पोलिस अधिकारी काहीही बोलायला तयार नाहीत.

Advertisement

अरविंद श्रीवास्तव ऊर्फ यश ठाकूर याने हा आरोप केला आहे. तोही या प्रकरणातील एक आरोपी आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, त्याने मार्च महिन्यात ‘एसीबी’ला एक ई-मेल पाठवून याबाबत तक्रार केली होती. ‘एसीबी’ने एप्रिलमध्ये ही तक्रार मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयाला पाठवली.

अमेरिकेत अरविंद श्रीवास्तव याची ‘फ्लिज मूव्हीज’ नावाची कंपनी होती. त्याआधी या कंपनीचे नाव ‘न्यूफ्लिक्स’ होते. मार्चमध्ये पोलिसांनी या कंपनीला नॉमिनेट करीत, श्रीवास्तव याचे दोन बँक अकाऊंट ‘सीज’ केले. या बँक खात्यात 4.5 कोटी रुपये होते. पोलिसांच्या एका खबरीने कंपनीकडे 25 लाख रुपये मागितल्याचा दावा ‘न्यूफ्लिक्स’ने केला आहे.

Advertisement

दरम्यान, राजचा बिझनेस पार्टनर उमेश कामत याच्या ऑफिसवर क्राईम ब्रॅंचने छापा घातला. तेथे तब्बल 70 अश्लील व्हिडिओ त्यांच्या हाती लागले आहेत. विविध प्रोडक्शन हाऊसने त्यांना हे व्हिडिओ पाठविल्याचे समजले.

राज कुंद्रा आणि उमेश कामत यांनी ‘हॉटशॉट’ वेबसीरिज अॅपवर आतापर्यंत 90 व्हिडीओ शेअर केले आहेत. जवळपास 30 मिनिटांच्या या व्हिडीओत मोठ्या प्रमाणात अश्लील दृश्ये असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

Advertisement

राज कुंद्रा याने चौकशीदरम्यान ‘युके’तील ‘केनरिन’ कंपनीसोबत त्याचे व्यावसायिक संबंध असल्याचे मान्य केले. मात्र, त्यांनी पॉर्न व्हिडीओची निर्मिती केली नसून, केवळ ‘एरॉटिक बोल्ड’ सीरिजची निर्मिती करीत असल्याचा त्याचा दावा आहे.

राजने कमावला 500 कोटींचा नफा
अश्लिल व्हिडीओंच्या माध्यमातून राजने जवळपास 500 कोटींचा नफा कमावला. ‘हॉटशॉट’ने कमी वेळात मोठ्या प्रमाणात सबस्क्राईबर्स मिळविले होते. त्यातून कोट्यवधींचा नफा मिळविल्याचे समोर आलेय.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/impnews

Advertisement