SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

राज कुंद्राची पॉर्नोग्राफी अ‍ॅपमधून दिवसाची कमाई लाखो रुपये, पोलीस तपासात आणखी काय झालं उघड?

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) याला अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणी सोमवारी रात्री अटक झाली. राज कुंद्राला अटक झाल्यानंतर याबद्दल चर्चांना उधाण आलेलं आहे. राज कुंद्रा आणि इतर एक आरोपी ज्याचं नाव रियान थार्प आहे, अशा दोघांना न्यायालयात हजर केलं असता त्या दोघांची 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

राज कुंद्राचे ऑक्टोबर महिन्यामधील चॅट:

Advertisement

पोलिस अधिक तपास करत असून आता पोलिसाच्या हाती राज कुंद्रा आणि त्याच्या साथीदारांमधील व्हॉट्सअप चॅट हाती लागलं आहे. राज कुंद्राच्या या व्हाट्सअप चॅटमुळे एकेक गोष्टी उलगडल्या आहे. प्राप्त माहितीनुसार, अश्लील सिनेमा व पॉर्नोग्राफी अ‍ॅपमधून अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा दिवसाला लाखो कमवायचा, अस समजतंय.

राज कुंद्राने त्याच्या कामासाठी एक व्हाटस्अप ग्रुपदेखील तयार केला होता. राज कुंद्रा या ग्रुपचा अ‍ॅडमिन होता. याच ग्रूपमध्ये कोणाचे किती पैसे द्यायचे याबाबद्दल चर्चा झालेली आहे, असं उघड झालं. या व्हाटस्अप ग्रुपचं नाव ‘एच’ असं होतं.

Advertisement

अधिक माहीती अशी की, (WhatsApp chats between Kundra and his partners) राज कुंद्रा प्रदीप बक्शी (Pradeep Bakshi) नावाच्या व्यक्तीबद्दल पैशाचे व्यवहार आणि फिल्ममध्ये कोणता, कसा कंटेंट हवा यांबद्दल चर्चा करत असत. या चॅटमधून राज कुंद्रा अश्लील सिनेमाच्या निर्मितीतून दिवसाला लाखो रुपये कमवत असल्याचं उघड झालंय.

राज कुंद्राची दिवसाला कमाई लाखो रुपये?

Advertisement

राज कुंद्रा पॉर्नोग्राफीमधून (Pornography) दिवसाला लाखो रुपये कमवायचा. या चॅटनुसार राज कुंद्रा ‘हॉटशॉट’ नावाच्या पॉर्नोग्राफी अ‍ॅपवरील लाईव्हमधून दररोज 1 लाख 85 हजार रुपयांची कमाई करत असल्याचं उघड झालं आहे.

कित्येक दिवसापासून तो अश्लील व्हिडीओद्वारे दिवसाला 4 लाख 53,000 रुपये कमवत होता. राज कुंद्राच्या ‘हॉटशॉट्स’ अ‍ॅपचे (Hotshots App) 2020 सालापर्यंत 20 लाखांहून अधिक सबस्क्रायबर झाले होते. या बिझनेसमध्ये एकूण 8 ते 10 कोटींची उलाढाल होत असल्याचं समोर आलं आहे.

Advertisement

राज कुंद्राच्या ग्रुपमध्ये बिझनेस किती झाला, फायदा व तोटा किती झाला अशा सर्व गोष्टींवर चर्चा होत असे. प्रदीप बक्शीने राजला त्यांच्या विविध प्रोजेक्टमध्ये काम करणाऱ्यांच्या कॉट्रॅक्टचे पैसे म्हणजेच कामाचे पैसे देण्याबद्दल चॅट केलं आहे. अशीही माहीती आहे की, राजने 81 कलाकारांचे पैसे थकवले आहेत. असं खूप काही चॅटमधून समोर आलं आहे. यामुळे राज कुंद्राच्या अडचणी वाढ होणार आहे, असंच दिसत आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement