सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय पोस्ट खात्यात विविध 57 पदांसाठी नोकरभरती केली जाणार आहे.
भारतीय टपाल विभागाच्या पंजाब सर्कलने असिस्टंस, सॉर्टींग असिस्टंस, मल्टी टास्किंग स्टाफ केडर पदाच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. कुठल्याही पदासाठी पोस्टाच्या वेबसाईटवर अर्ज करावा लागणार आहे.
एकूण जागा
पोस्टल सहायक – 45
सॉर्टींग असिस्टंस – 9
मल्टी टास्किंग स्टाफ केडर – 3
पात्रता
– ‘मल्टी टास्किंग स्टाफ केडर’ पदासाठी उमेदवार दहावी ऊत्तीर्ण असणे आवश्यक, तसेच स्थानिक भाषेचे ज्ञान असावे.
– पोस्टल सहायक व सॉर्टींग असिस्टंस पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून उमेदवार बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे. तसेच उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेचे संगणकाच्या मूलभूत ज्ञानाचे प्रमाणपत्र असावे.
वयाची अट
टपाल सहायक, सॉर्टींग असिस्टंस पदासाठी अर्जदाराचे वय 18 ते 27 वर्षे असावे. तसेच मल्टी टास्किंग स्टाफसाठी ते 18 ते 25 वर्षे असावे. आरक्षित उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत देण्यात येईल.
पगार
टपाल सहायक, सॉर्टींग असिस्टंस पदासाठी 25,500 ते 81,100 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.
मल्टी टास्किंग स्टाफसाठी 18,000 ते 56,900 रुपये पगार असेल.
पोस्टाची वेबसाईट – https://www.indiapost.gov.in/va/pages/indiaposthome.aspx
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑगस्ट 2021
नोटिफिकेशन पाहण्यासाठी वेबसाईट – https://www.indiapost.gov.in/VAS/Pages/Recruitment/IP_09072021