SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

India vs Sri Lanka 2021: भारताचा दुसऱ्या वनडेतही विजय; दीपक चहरने श्रीलंकेला धुतले!

भारताने दुसऱ्या वनडेत श्रीलंकेवर तीन गड्यांनी मात (India beat Sri Lanka by 3 wickets) केली. यासोबतच भारताने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेतली. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 9 बाद 275 धावा काढल्या. प्रत्युत्तरात भारताने 49.1 षटकात 7 गड्यांच्या माेबदल्यात लक्ष्य गाठत धवनच्या नेतृत्वात भारताचा हा पहिला मालिका विजयाची नाेंद केली.

भुवनेश्वर (3/54) आणि युजवेंद्र चहलच्या (3/50) जोरदार गाेलंदाजीसोबतच सूर्यकुमार यादव (53) व सामनावीर दीपक चहरच्या (नाबाद 69) अर्धशतकी खेळीच्या जोरावर (Deepak Chahar remained not out on 69 off 82 balls) भारतीय क्रिकेट संघाने मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध विजय साकारला. दीपक चहरने झुंजार अर्धशतकी खेळी करत भुवनेश्वरसोबत 84 धावांची अभेद्य भागीदारी रचली. आता शुक्रवारी तिसरा व शेवटचा सामना रंगणार आहे.

Advertisement

भारतीय फलंदाजी :

▪️ पृथ्वी शॉला 3 चौकारांसह 13 धावा करता आल्या.
▪️ धवनने 6 चौकारांसह 29 धावा केल्या.
▪️ इशान किशनही 1 धावेवर बाद झाला.
▪️ मनीष पांडेने 3 चौकारांसह 37 धावा केल्या.
▪️ सू्र्यकुमारने 6 चौकारांसह 53 धावा केल्या.
▪️ हार्दिक पंड्या शून्यावर माघारी परतला.
▪️ कृणाल पंड्या 3 चौकारांसह 35 धावा काढून बाद झाला.
▪️ दीपक चहरने 7 चौकार व 1 षटकारासह नाबाद 69 धावा केल्या.
▪️ भुवनेश्वर कुमारने 19 धावा केल्या.

Advertisement

श्रीलंका फलंदाजी :

तत्पूर्वी श्रीलंकेने सलामीवीर अविष्का फर्नांडो आणि असालांका यांची अर्धशतके, चमिका करुणारत्नेने 44 धावांचे योगदान दिल्यामुळ श्रीलंकेने 50 षटकात 9 बाद 275 धावा केल्या होत्या.

Advertisement

मिनोद भानुका 36 धावा करत बाद झाला, असा लंकेला चहलने पहिला धक्का दिला. फर्नांडोने 4 चौकार आणि एका षटकारासह 50 धावा केल्या. डि सिल्वाने 32 धावांचे योगदान दिले. शनाकाने 16 धावा केल्या. मधल्या फळीत असालांकाने 6 चौकारांसह 65 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत संघाच्या धावसंख्येत योगदान दिले. करुणारत्नेने 5 चौकारांसह नाबाद 44 धावांची खेळी केली. भारताकडून चहल आणि भुवनेश्वरला प्रत्येकी 3 बळी घेता आले. दीपक चहरने 2 बळी टिपले.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement