SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

लेकीच्या सासरी पाठविले अनोखे गिफ्ट..! एक टन मासे, 250 किलो मिठाई नि 10 बकऱ्यांची भेट, पाहुणे मंडळी झाली अचंबित..!

मुलीचे लग्न म्हणजे तिच्या वडिलांसाठी अतिशय भावनिक विषय. लहाणपणापासून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला गोळा दुसऱ्याच्या हवाली करताना, बापाला काळजावर दगड ठेवावा लागतो. त्यात मुलीचे लग्न म्हणजे एक प्रतिष्ठेचा विषय झाला आहे.

मुलीच्या लग्नात, तसेच लग्नानंतरही तिच्या सासरची मंडळी दुखावू नयेत, पाहुण्यांच्या सरबराईत काही कमी पडू नये, यासाठी मुलीच्या बापाची धावपळ चाललेली असते. लेकीला सासरी पाठविताना, तसेच नंतरही सण-उत्सवातही प्रत्येक बाप आपल्या ऐपतीप्रमाणे मुलीला माहेरचा आहेर देत असतो.

Advertisement

अशाच एका नववधूचा लग्नानंतरचा पहिला आषाढ महिना आगळा-वेगळा ठरावा, यासाठी एका बापाने तिला आतापर्यंत कोणीच पाठवले नसेल, असे गिफ्ट पाठवले. ती भेट पाहुन मुलीच्या सासरीची मंडळीही अचंबित झाली.

ही भेट होती, तब्बल 1 टन मासे, 250 किलो मिठाई, 1000 किलो भाजीपाला, 250 किलो किराणा, 250 डब्बे लोणचे, 250 किलो झिंगा, 50 किलो चिकन आणि 10 बकऱ्या..!

Advertisement

आंध्र प्रदेशातील राजमुंदरी येथील या घटनेची सोशल मीडियावर जोरात चर्चा आहे. येथील व्यावसायिक बतूला बलराम कृष्णा यांच्या मुलगी प्रत्युषा हिचा अलीकडेच पुडुचेरी येथील यनममधील अग्रणी व्यावसायिकाचा मुलगा पवन कुमार याच्याशी लग्न झालं.

आंध्र प्रदेशात आषाढ महिन्याला पवित्र मानले जाते. या महिन्यात मुलीच्या घरच्यांकडून सासरच्या मंडळींना भेटवस्तू पाठवल्या जातात.

Advertisement

त्यानुसार, राजमुंदरी येथील व्यावसायिक बतूला बलराम कृष्णा यांनी पुडुचेरीतील यनम येथील आपल्या मुलीच्या सासरी चक्क वरीलप्रमाणे भेटवस्तू पाठविल्या. कोणीतरी या भेटवस्तूंचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला नि पाहता पाहता हा फोटो सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/impnews

Advertisement