SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

व्हॉट्स अ‍ॅपच्या ग्रुप काॅलमध्येही कधीही जाॅईन होता येणार..! नव्या फिचरची घोषणा, जाणून घेण्यासाठी वाचा..

सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातही व्हॉट्स अ‍ॅप तर सगळ्यांच्या गळ्यातील ताईत बनले आहे. या व्हॉट्स अ‍ॅपवरील ‘ग्रुप कॉल’ फिचरचा अनेकांनी फायदा घेतला असेल.

आता व्हॉट्स अ‍ॅपने आपल्या वापरकर्त्यांना कोणत्याही कॉलमध्ये सामील होण्यास सोप्प व्हावं, म्हणून ‘जॉईनेबल ग्रुप कॉल’ हे नवीन फीचर आज (सोमवारी) लॉंच केलं.

Advertisement

व्हॉट्स अ‍ॅपवरील कॉलमधून तुम्ही एकदा का लेफ्ट झाले, की पुन्हा स्वतःहून जॉईन होऊ शकत नव्हता किंवा तुम्हाला काही वेळाने कॉलमध्ये जॉईन व्हायचे असेल, तर तेही शक्य नव्हते. मात्र, आता या अडचणी दूर होणार आहेत. त्यासाठी तुम्हाला फक्त अ‍ॅप अपडेट करावे लागणार आहे.

‘जॉईनेबल ग्रुप कॉल’मुळे वापरकर्त्यांला ग्रुप कॉल सुरु झाल्यावर काही मिनिटांनंतरही ग्रुप कॉलमध्ये सामील होता येणार आहे. आपला कोणताही कॉल चुकणार नाही.

Advertisement

कॉल आलेल्या वेळी आपण काहीही कारणामुळे व्यस्थ असल्यास, नंतरही कॉलमध्ये सामील होऊ शकताे. तुम्हाला हवं तेव्हा कॉलमधून बाहेरही पडता येईल व त्यानंतर पुन्हा सामीलही होता येणार आहे.

आपल्या निवेदनात व्हॉट्स अ‍ॅपने म्हटले आहे, की आपण एकमेकांपासून दूर असतो, तेव्हा मित्र व कुटूंबासमवेत ग्रुप कॉलवर एकत्र येण्यापेक्षा चांगले काय असेल? आपण असा एखादा खास क्षण मिस करू नये, म्हणून आम्ही हे नवीन फिचर आणले आहे.

Advertisement

ग्रुप कॉलची लोकप्रियता जसजशी वाढत आहे, तसतसे आम्ही वापरकर्त्यांसाठी अजून बदल करीत आहोत, अपडेट करायचा प्रयत्न करीत आहोत. अर्थातच त्यातही एंड-टू-एंड एन्क्रिप्शनची सुरक्षा आणि गोपनीयता आहेच..!

कसं वापरणार हे फिचर..?

Advertisement

१. तुम्हाला कोणी ग्रुप कॉलमध्ये सामील करील, तेव्हा तुम्हाला प्रथम अ‍ॅपकडून सूचना येईल.

२. तुम्ही त्या कॉलमध्ये तात्काळ सामील होण्यास इच्छूक नसाल, तर ‘इग्नोर’ वर टॅप करू शकता. परंतु तुम्हाला कॉलमध्ये सहभागी व्हायचे असेल, तर नेहमीप्रमाने कॉल घ्या.

Advertisement

३. तुम्ही कॉल मेनूमधून कॉलमध्ये सामील होण्यासाठी अद्याप सहभागी न झालेल्या लोकांची संख्या तपासू शकता.

४. कॉलमध्ये नंतर सामील होण्यासाठी ‘टॅप जॉईन’वर टॅप करा आणि तुम्हाला चॅट विंडोमध्ये पर्याय दिसेल.

Advertisement

५. तुम्ही कॉलवर असताना ‘ओपन कॉल इन्फो स्क्रीन’ हे उघडून ‘अॅड मोर’वर टॅप करा. अशाप्रकारे तुम्ही कॉलमध्ये अधिक लोकांना जोडू शकता.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/impnews

Advertisement