SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मोठी बातमी: शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक, अश्लील चित्रपटांची निर्मिती करून केलं ‘हे’ कृत्य..

मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योगपती राज कुंद्रा यांना अश्लील चित्रपटांची निर्मिती करुन काही मोबाईल ॲप्सवर प्रदर्शित केल्याप्रकरणी अटक (Shilpa Shetty’s Husband Raj Kundra Arrested by Mumbai Police) केली आहे. सोमवारी पोलिसांनी ही कारवाई केली.

पॉर्न फिल्म्सची निर्मिती (Production) करून या फिल्म्स ठराविक मोबाईल ॲप्सवर प्रदर्शित केल्याची घटना काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी उघडकीस आणली होती. त्यानंतर या प्रकरणात राज कुंद्रा यांचे नाव समोर आले होते. याच प्रकरणात राज कु्ंद्रा यांना चौकशीसाठी बोलावण्यात येऊन त्यांची 7 ते 8 तास चौकशी करण्यात आली.

Advertisement

अश्लील चित्रपटांची निर्मिती करणे आणि ते प्रदर्शित करण्याच्या आरोपाखाली राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. कुंद्राला आज (20 जुलै) न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी ही माहिती दिली.

प्रकरण काय?

Advertisement

राज्यातील मुंबई पोलिसांच्या एका पथकाने पॉर्नोग्राफिक शुटिंग होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात मढ येथील ग्रीन पार्क बंगल्यावर धाड टाकली होती. पोलिसांनी कारवाई करत त्यावेळी 5 जणांना अटक केली होती.

या पॉर्नोग्राफिक शुटिंग प्रकरणात राज कुंद्रा मुख्य सूत्रधार असल्याचं कळलं आहे. यासंदर्भात त्यांच्याविरुद्ध पोलिसांकडे पुरेसे पुरावे असल्याचीही माहिती पोलीस आयुक्त नगराळे यांनी दिली. राज कुंद्रा यांच्यासोबतच या प्रकरणी एकूण 11 जणांना अटक करण्यात आली आहे.

Advertisement

यात एका मुलीची सुटका केली होती. पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये दोन अभिनेत्यांचा, तर दोन तरुणींचा समावेश आहे. या दोन्ही तरुणी अभिनय क्षेत्रात आपलं करिअर करण्यासाठी मुंबईत आल्या होत्या. मात्र, त्या पॉर्नोग्राफिक व्हिडीओ तयार करणाऱ्या प्रॉडक्शन हाऊसच्या जाळ्यात अडकल्या. ही मोठी कारवाई केल्यानंतर या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला होता.

राज कुंद्राने यापूर्वी केलेले गुन्हे:

Advertisement

राज कुंद्रा यांना अटक झालेली ही पहिलीच वेळ नाही. याआधीही कित्येक वेळा त्यांना कोर्टात जावं लागलं होतं. यापूर्वी मार्च 2010 मध्ये राज कुंद्रा व त्यांची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) या दोघांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली गेली होती. मुंबईतील एनआरआय अभिनेता सचिन जोशी यांनी ही तक्रार दाखल केली होती. एवढंच नाही, तर आयपीएल सट्टेबाजी (IPL betting) प्रकरणातही राज कुंद्रा (Raj Kundra) हे अडकले होते. त्या प्रकरणात आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाला कारवाईलाही सामोरे जावे लागले होते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement