SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पंढरीच्या वारीबाबत सुप्रिम कोर्टाचा मोठा निर्णय..! आषाढी एकादशीच्या तोंडावर दिला महत्वपूर्ण आदेश, जाणून घेण्यासाठी वाचा..!

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आल्याने, राज्य सरकारने गतवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीनिमित्त काढण्यात येणाऱ्या पायी वारीला मनाई केली होती. मात्र, सरकारच्या या निर्णयाविरुद्ध संत नामदेव संस्थानचे वारकरी, तसेच वारकरी संप्रदायातील इतर समुहांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता.

आषाढी एकादशीला अवघा एक दिवस राहिलेला असताना, सर्वोच्च न्यायालयाने त्यावर निर्णय देताना वारकऱ्यांची याचिका फेटाळून लावली आहे.

Advertisement

सरन्यायाधीश एन. व्ही. रमन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या याचिकेवर समक्ष सुनावणी झाली. त्यात कोरोनामुळे देशातील परिस्थितीची जाण वारकऱ्यांना आहे. असे असताना कुठलेही निर्बंध नसावेत? अशी आपली इच्छा आहे का? मात्र, आम्ही असे करू शकत नसल्याचे सांगून सरन्यायाधीशांनी ही याचिका फेटाळली.

दरम्यान, राज्य सरकारने आषाढी एकादशीला केवळ 10 पालख्यांनाच परवानगी दिलीय. त्याऐवजी वारकरी संप्रदाय, तसेच 250 नोंदणीकृत पालख्यांना पंढरीची वार्षिक तीर्थयात्रा पूर्ण करण्याची परवानगी देण्याची विनंती याचिकेत केली होती.

Advertisement

त्यावर मंदिराखालच्या भागातील संत नामदेव यांच्या जन्मस्थळावरून निघणाऱ्या पालखीलाही सरकारने परवानगी दिलेली नाही. या पालखीला परवानगी देण्यासाठी राज्य सरकारला निर्देश देण्याची विनंती याचिकेत केली होती.

वारकरी कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळतील, शिस्तबद्दरित्या वारी निघत असल्याने त्यावर बंदी आणण्याचे कारण नाही. तसेच इतर राज्यातून येणाऱ्या वारकऱ्यांसाठी सरकारने आंतरराज्यीय प्रवास व्यवस्था करावी.

Advertisement

देशातील वारकऱ्यांसाठी मंदिर २४ तास खुले ठेवावे, आदी मागण्या याचिकेत करण्यात आल्या होत्या. मात्र, सरकारने सर्व मागण्या फेटाळल्या आहेत.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/impnews

Advertisement