सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, नव्या कामगार कायद्यानुसार, सरकारी नोकरदारांसाठी कामाचे दिवस कमी होणार आहेत. संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून (ता.18) सुरु झाले असून, त्यात हा कायदा संमत होण्याची चिन्हे आहेत.
मोदी सरकार संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अनेक विधेयके मांडणार आहेत. ही विधेयके पारित झाल्यावर देशात काही नवे कायदेही लागू होतील. त्यातीलच एक विधेयक आहे, कामगार कायद्याचे..!
सध्या नोकरदारांना रोज 8 तास, असे 5 दिवस काम व दोन दिवस सुटी मिळते. मात्र, नव्या कामगार कायद्यानुसार सरकारी नोकरदारांचा आठवडा आता 4 दिवसांचा होणार आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना 3 दिवस सुट्टी मिळू शकते.
अर्थात, या कर्मचाऱ्यांचा ‘वीकेंड’ हा गुरुवारपासूनच सुरू होईल. शुक्रवार, शनिवार आणि रविवारी हे कर्मचारी सुट्टीचा आनंद घेऊ शकतील. केंद्र सरकार 1 जुलै 2021 पासूनच हा कायदा आणणार होते; पण राज्य सरकारांनी तशी तयारी दाखवली नाही. त्यामुळे आता 1 ऑक्टोबर 2021 पासून हा कायदा लागू होऊ शकतो.
नव्या कामगार कायद्यानुसार, नोकरदाराने आठवड्यात 48 तास काम करणं आवश्यक आहे. कंपनी आणि कर्मचारी परस्पर सहमतीने कामाचे तास निश्चित करू शकतात. रोज 12 तास काम केल्यास आठवड्यातील 4 दिवसच कामावर यावे लागेल. हा निर्णय कंपनीवर सोडला आहे; पण आठवड्यात 48 तास भरणे गरजेचे आहे.
ऑगस्ट-2019 मध्ये संसदेत तीन कामगार कायदे मांडले होते. त्यानुसार इंडस्ट्रीयल रिलेशन, कामाची सुरक्षितता आणि हेल्थ आणि वर्किंग कंडिशन व सोशल सिक्युरिटीशी संबंधित नियमांत बदल करण्यात आला आहे.
नव्या कायद्यानुसार, आता ठरलेल्या पगाराच्या 50 टक्के वा त्यापेक्षा जास्त बेसिक पे कंपनीला द्यावा लागणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना हातात मिळणाऱ्या पगारात घट झाली, तरी बेसिक पे वाढल्याने पीएफ व ग्रॅच्युइटीची रक्कम वाढेल. कंपन्यांना पीएफ, ग्रॅच्युइटीसाठी अधिक खर्च करावा लागेल, त्यामुळे त्यांच्या बॅलन्सशीटमध्ये बराच फरक पडण्याची शक्यता आहे.
बारावीच्या निकालाबाबत मोठी अपडेट..! कधी लागणार निकाल जाणून घेण्यासाठी वाचा..?
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/Breaking