SpreadIt News | Digital Newspaper

बारावीच्या निकालाबाबत मोठी अपडेट..! कधी लागणार निकाल जाणून घेण्यासाठी वाचा..?

राज्याच्या शालेय शिक्षण मंडळाने नुकताच दहावीचा निकाल जाहीर केला. त्यानंतर आता सर्वांचे लक्ष बारावीच्या निकालाकडे लागले आहे.

कोरोनामुळे सुरवातीला दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला, तर बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते. मात्र, नंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्याने सरकारला बारावीचीही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला.

Advertisement

सरकारच्या निर्णयामुळे दहावीप्रमाणेच बारावीच्या परीक्षा यंदा होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे दहावीप्रमाणेच बारावीचा निकालही विशेष मूल्यांकन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. त्यासाठी 40:30:30 फॉर्म्युला वापरला जाणार आहे.

विद्यार्थ्यांना दहावी, अकरावीला मिळालेल्या मार्कांना प्रत्येकी 30 टक्के, तर बारावीतील अंतर्गत परीक्षा, असायमेन्टसला 40 टक्के वेटेज असेल. मूल्यांकन करण्यास वेळ लागल्याने बारावीचा निकाल जाहीर होण्यास उशीर झाला आहे.

Advertisement

दरम्यान, सर्वांचे लक्ष आता बारावीच्या निकालाकडे लक्ष लागले आहे.  यापूर्वी ४ ऑगस्टपर्यंत हा निकाल जाहीर केला जाणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आता हा निकाल 21 जुलैला लागणार असल्याची शक्यता राज्याच्या शिक्षण मंडळातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर एकाच वेळी विद्यार्थी-पालकांनी वेबसाईट ओपन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ओव्हरलोड होऊन वेबसाईट क्रॅश झाली होती. आता बारावीच्या निकालाच्या दिवशी तरी अशी तांत्रिक अडचण येणार नाही, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे.

Advertisement

राज्य शिक्षण मंडळाने अजून बारावीच्या निकालाची अधिकृत तारख जाहीर केली नसली, तरी २१ तारखेला निकाल जाहीर होणार असेल, तर उद्या (ता. 20) दुपारपर्यंत राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यासंदर्भात माहिती देण्याची शक्यता आहे.

चार दिवस काम, तीन दिवस आराम..! मोदी सरकारच्या नव्या कामगार कायद्याबाबत जाणून घेण्यासाठी वाचा..!

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/impnews

Advertisement