SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दहावीचा निकाल पाहताना क्रॅश झालेली वेबसाईट पूर्ववत, आता निकाल ‘असा’ पाहा..

राज्यातील महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे 16 जुलैला दुपारी दहावीचा निकाल जाहीर झाला. 16 जुलैला सकाळी विभागनिहाय पास झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी जाहीर करण्यात आली, त्यात मुलींनी बाजी मारल्याचं पाहायला मिळालं. यावेळी निकाल पाहताना तांत्रिक अडचणी आल्याचं पाहायला मिळालं.

तांत्रिक अडचणींचा सामना

Advertisement

मंडळाने सांगितल्याप्रमाणे 16 जुलै रोजी दुपारी 1 वाजता दहावीच्या विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर निकाल पाहता येणार होता; पण संकेतस्थळावर तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यात अनेक अडचणी येत होत्या.

माध्यमिक शालांत परीक्षेच्या संकेतस्थळावर अचानक भेट देणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे संकेतस्थळ काही काळासाठी क्रॅश (Crash) झाल्याने विद्यार्थांना आपला निकाल बघता आला नाही.

Advertisement

राज्यातील दहावीच्या बोर्डाचा (SSC Board) निकाल जाहीर झाला आहे. दहावीचा निकाल विद्यार्थ्यांना http://result.mh-ssc.ac.in, http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहायला मिळणार होता, मात्र, ही संकेतस्थळं डाऊन (Server Down) झाली होती. सध्या ती पूर्ववत झाली आहेत.

10वीच्या विद्यार्थ्यांची निकाल पाहण्यासाठी उत्सुकता वाढली होती. पण विद्यार्थी, पालक, शिक्षकांना मानसिक ताणाला सामोरे जावे लागले. शासनाने ही समस्या सोडविण्यासाठी राज्य मंडळामार्फत दहावीचा निकाल (10th result) घोषित करताना उद्भवलेल्या त्रुटीसंदर्भात शासनाने चौकशी समिती गठीत केली आहे.

Advertisement

समिती कोणती चौकशी करणार?

▪️ 10वीच्या निकालाआधी राज्यातील शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी संबंधितांसोबत बैठक आयोजित केली होती का?
▪️ 10वीचा निकाल संकेतस्थळावर घोषित करताना शिक्षण मंडळामधील संबंधित तांत्रिक सल्लागारांना पुर्वसूचना दिली होती का?
▪️ निकाल घोषित करण्यासाठी उच्च क्षमतेच्या सर्व्हरचा वापर केला होता का?
▪️ संकेतस्थळाची देखभाल बघणाऱ्या कंपनीला हा निकाल घोषित करण्याबाबत पुर्वसूचना दिली होती का?
▪️ 10वीला प्रविष्ठ असलेल्या विद्यार्थ्यांची जास्त संख्या असल्यामुळे सदर निकाल संकेतस्थळावर घोषित करताना संकेतस्थळाची पुर्व तपासणी केली होती का?

Advertisement

दरम्यान या परिस्थितीला जबाबदार मंडळातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना या समितीमार्फत होणाऱ्या काही चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. या समितीने तपासणी अहवाल 15 दिवसांत शासनाला सादर करावा, असे आदेश महाराष्ट्र शासनाचे सहसचिव राजेंद्र पवार यांनी दिले आहेत.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement