SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ रविवार, 18 जुलै 2021

मेष (Aries) : योगाचा तुम्हाला फायदा होईल. संघर्षाला विनाकारण हवा देऊ नका. खेळीमेळीने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा.

Advertisement

वृषभ (Taurus) : कलात्मक काम तुम्हाला आनंद देईल. नव्या संकल्पना फलद्रुप होतील. घरातील लहान मुलांसोबत वेळ घालवाल.

मिथुन (Gemini) : तरुण मित्रांच्यात वावराल. नवीन ओळखी होतील. अनुभवी लोकांचा सल्ला विचारात घ्यावा.

Advertisement

कर्क (Cancer): मनातील चुकीचे विचार काढून टाका. कामाचा ताण वाढला तरी फायद्यात राहाल. चांगला व्यावसायिक लाभ मिळेल.

सिंह (Leo) : नसत्या शंका मनात आणू नका. व्यावसायिक कामात स्पष्टता ठेवावी. वैचारिक गोंधळ घालू नका.

Advertisement

कन्या (Virgo): मित्रांशी पैज लावाल. आपला संयम ढळू देऊ नका. बचत करण्यावर अधिक भर द्यावा.

तूळ (Libra) : काही गोष्टींबाबत आग्रही राहाल. दीर्घकालीन फायद्याचा विचार कराल. नातेवाईकांवर आपली मते लादू नका.

Advertisement

वृश्चिक (Scorpio) : कौटुंबिक खर्चाचा अधिक विचार कराल. इतरांना दुखवू नका. ताळमेळ साधत कामे करावी लागतील.

धनु (Sagittarius) : मनातील निराशा झटकून टाका. आरोग्यात काहीशी सुधारणा होईल. प्रवासात काळजी घ्यावी.

Advertisement

मकर (Capricorn) : आलेल्या अनुभवातून काहीतरी शिकण्यास मिळेल. कुटुंबातील सदस्यांचे मत मान्य करावे लागेल. जुन्या कामातून यश मिळेल.

कुंभ (Aquarius) : कौटुंबिक जबाबदारी अंगावर पडेल. प्रिय व्यक्तीची आवड पूर्ण करावी लागेल. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल.

Advertisement

मीन (Pisces) : काही गोष्टींची तडजोड करावी लागेल. जवळचा प्रवास करावा लागेल. कमिशन मधून चांगला लाभ कमवाल.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement

 

Advertisement