SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पैसे घेऊन तुमच्या दारात येणार बॅंक..! स्टेट बॅंकेच्या अनोख्या सुविधेबाबत जाणून घेण्यासाठी वाचा..

कोरोनामुळे जनजीवन अजूनही पूर्वपदावर आलेले नाही. त्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आल्याने नागरिक काही प्रमाणात धास्तावलेले आहेत. अशा काळात गर्दीच्या ठिकाणी जाणे धोकादायक ठरणार आहे.

ही बाब लक्षात घेऊन स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) त्यांच्या ग्राहकांसाठी ‘डोअर स्टेप बँकिंग’ सुविधा आणली आहे. या बॅंकेत खाते असणाऱ्या खातेदारांना घरबसल्या पैसे काढता वा जमा करता येणार आहेत. तसेच पे ऑर्डर्स, नवीन चेकबुक, नवीन चेकबुक रिक्वेझेशन स्लीप अशा सुविधाही मिळतील.

Advertisement

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या ‘डोअर स्टेप बँकिंग’ सुविधेत ग्राहकांना कमीत कमी 1000 ते जास्तीत जास्त 20000 रुपयांपर्यंत व्यवहार करता येणार आहे. अर्थात, त्यासाठी तुमच्या खात्यात पर्याप्त रक्कम असणे गरजेते आहे, अन्यथा तुमचा व्यवहार रद्द होऊ शकतो.

Advertisement

‘एसबीआय’ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन या सुविधेबाबत माहिती दिली. त्यात ‘आता बँक तुमच्या दारापर्यंत…’ असं म्हटलं आहे. या सुविधेबाबत अधिक माहितीसाठी https://bank.sbi/dsb या लिंकला भेट देऊ शकता.

अशी करा ‘डोअर स्टेप बँकिंग..’
– सुरवातीला ‘होम ब्रँच’मध्ये नोंदणी करा.
– कॉन्टॅक्ट सेंटरवर ही सुविधा पूर्ण होत नाही, तोवर ‘होम ब्रँच’मध्ये अर्ज करावा लागेल.
– पैसे जमा करणे वा काढण्याची अधिकाधिक मर्यादा 20000 रुपये आहे.

Advertisement

– सर्व Non-financial transactions व्यवहारांसाठी 60 रुपये जीएसटी शुल्क, तर financial transactions साठी 100 रुपये जीएसटी शुल्क आहे.
– पैसे काढण्यासाठी चेक आणि विड्रॉल फॉर्मसह पासबूक आवश्यक.

– जॉइंट अकाउंट, मायनर अकाउंट, नॉन-पर्सनल अकाउंट, तसेच ज्या ग्राहकांचा रजिस्टर पत्ता ‘होम ब्रँच’पासून पाच किलोमीटरवर आहे, त्यांनाच ही सुविधा मिळेल.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/impnews

Advertisement