SpreadIt News | Digital Newspaper

फुकटच्या पामतेलावर डल्ला मारण्यासाठी लोटले अवघे गाव.. जळगावात टॅंकरला मोठा अपघात, घटनेबाबत जाणून घेण्यासाठी वाचा..

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीत सर्वसामान्य नागरिकांचे खाद्यतेलाच्या किंमतीकडे दुर्लक्ष झाले होते. मात्र, देशात खाद्यतेलाच्या किमतीने कधीच दीड शतक पार केले आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

सततच्या महागाईने कंबरडे मोडलेल्या सर्वसामान्य जनतेसाठी आजची (रविवार) पहाटे एक खुशखबर घेऊन आली, म्हणजे खाद्यतेलाच्या किंमती वगैरे कमी झाल्या नाही, तर पामतेल घेऊन जाणारा टॅंकर जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव शिवारात उलटला.

Advertisement

माहिती मिळण्याचा अवकाश, या पामतेलावर डल्ला मारण्यासाठी हातात मिळेल, ते भांडे घेऊन अवघे गाव घटनास्थळी धावले. पोट (भांडी) भरुन तेल लुटण्यात आले.

अपघातग्रस्तांबद्दल साधे कोणी विचारपूसही करीत नव्हते. सगळे गावकरी तेल पळविण्यात रमले होते. कोणीतरी त्याचे मोबाईलमध्ये शुटिंग काढले नि पाहता पाहता हा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला.

Advertisement

मध्य प्रदेशातील इंदोर येथून पामतेल घेऊन चालक आझाद पटेल हे टॅंकर घेऊन जळगावच्या दिशेने जात होते. मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगावजवळ आज पहाटे चालकाचे टॅंकरवरील नियंत्रण सुटले नि काही कळण्याच्या आत रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या खड्ड्यात टँकर पलटी झाला.

अपघातात टॅंकर फुटल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात तेलगळती सुरु झाली. घटनास्थळी पामतेलाचे छोटं तळंच साचलं. त्यामुळे टॅंकरचालकाचाही नाईलाज झाला.

Advertisement

दरम्यानच्या काळात या अपघाताची माहिती परिसरातील नागरिकांना मिळाली. मग काय हाताला लागेल ते भांडं घेऊन गावकरी घटनास्थळी धावले. साचलेल्या तेलावर डल्ला मारला आहे. प्लॅस्टिकचे मोठे कॅन, बादल्या भरून भरुन नागरिकांनी पामतेल लुटले. हताश झालेला टॅंकरचालक उघड्या डोळ्यांनी ही लूट पाहत होता.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/impnews

Advertisement