SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

10वी पास झाल्यावर आता पुढं काय करायचं? ‘हे’ कोर्स केले तर करिअरमध्ये यशस्वी व्हाल, जाणून घ्या..

जर एखाद्या विद्यार्थ्याला 10 वी नंतर नोकरी करायची असेल तर त्याच्यासाठी काही डिप्लोमा आणि पार्टटाईम कोर्सेस (Courses After 10th) आहेत. जर 10वी नंतर तुम्ही 11वी-12वी करणार असाल, तर त्यासाठी तुम्हाला विज्ञान, कॉमर्स आणि आर्ट्स या तीन शाखा आहेत.

दहावीनंतर आपल्याला काय करता येऊ शकतं?

Advertisement

1) Diploma in Stenography: हा डिप्लोमा कोर्स केल्यावर विद्यार्थ्यांना शॉर्टहँड डिक्टेशन घेण्यास मदत करतात. म्हणजेच यामध्ये तुम्हाला ऐकून टायपिंग करावी लागते. हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला कंपनी, न्यायालय, जिल्हा परिषद, आयुक्त कार्यालय, आयकर विभाग आणि विद्यापीठ मंत्रालय यांसारख्या ठिकाणी नोकरी मिळू शकते

▪️ कोर्स कालावधी -1 वर्ष

Advertisement

2) Diploma in Animation: सध्याच्या युगात या कोर्सेची मागणी खूप वाढली आहे. कारण आजच जग हे पूर्णपणे डिजिटल झालं आहे. त्यात 2D, 3D ॲनिमेशन कोर्स हा तुमच्यासाठी चांगला ठरू शकतो. हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही ॲनिमेशन कंपनीमध्ये नोकरी मिळू शकते.

▪️ कोर्स कालावधी – 18 महिने ते 2 वर्ष

Advertisement

3) Diploma in Hotel Management and Catering Technology: ज्यांना जेवण बनविण्यात रस आहे, वेगवेगळ्या रेसिपी बनवणं आवडतं, त्यांनी हा कोर्स करायला हवा. हा डिप्लोमा केल्यानंतर हॉटेल, केटरिंग ऑफिस, केटरिंग सुपरवायझर & असिस्टंट आणि कॅबिन क्रू यामध्ये नोकरी मिळू शकते.

▪️ कोर्स कालावधी – 2 वर्ष

Advertisement

4) Diploma in Beauty care: हा कोर्स मुलींमध्ये खूप लोकप्रिय आहे.या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला ब्युटी केअर बद्दल खूप काही शिकायला मिळणार आहेत या मुला-मुलींना ब्युटी केअर मध्ये आवड आहे त्यांनी हा कोर्स केला पाहिजे. तुम्ही स्वतःच ब्युटी पार्लर सुद्धा चालू करू शकता. किंवा एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये ब्युटिशियन म्हणून सुद्धा नोकरी कर शकता.

▪️ कोर्स कालावधी – 4 वर्ष

Advertisement

5) Diploma in Cyber Security: सायबर सिक्योरिटी या कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थी एथिकल हॅकिंग संबंधित सर्व माहिती तुम्हाला या कोर्समध्ये मिळणार आहे. हा कोर्स केल्यानंतर तुम्ही सरकारी किंवा प्रायव्हेट एजन्सी, कंपनीमध्ये हॅकर म्हणून इथिकल हॅकिंगचं म्हणून काम करू शकता.

▪️ कोर्स कालावधी – 1 वर्ष

Advertisement

6) Diploma in Fire safety engineering: या कोर्सच्या नावावरूनच आपल्या लक्षात येईल की, आग लागल्यानंतर काय करावं लागणार आहे व त्यासाठी कोणते इन्स्ट्रुमेंट कसे वापरायचे ते सुद्धा तुम्हाला या डिप्लोमा कोर्समध्ये शिकण्यास मिळणार आहे. हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला फायर सेफ्टी ऑफिसर म्हणून काम करता येणार आहे.

▪️ कोर्स कालावधी – 6 महिने

Advertisement

7) Diploma in Fashion Technology: सर्वात पहिले तर फॅशन डिझाईन आणि फॅशन टेक्नॉलॉजी मध्ये खूप फरक आहे.फॅशन डिझाईन मध्ये तुम्ही खूप कर मोठ्या लेवल मध्ये करियर करू शकता. फॅशन डिझायनर, कॉस्ट्यूम डिजायनर, टेक्सटाइल डिझायनर यांसारख्या पदांवर तुम्ही काम करू शकता.

▪️ कोर्स कालावधी – 3 वर्ष

Advertisement

8) Diploma in engineering courses (Polytechnic ):

▪️ डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरींग
▪️ डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग
▪️ डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरींग
▪️ डिप्लोमा इन सिव्हील इंजिनिअरींग
▪️ डिप्लोमा इन कंप्यूटर इंजिनिअरींग
▪️ डिप्लोमा इन टेक्स्टाईल इंजिनिअरींग
▪️ डिप्लोमा इन मेडिकल इंजिनिअरींग
▪️ डिप्लोमा इन केमिकल इंजिनिअरींग
▪️ डिप्लोमा इन आयटी इंजिनिअरींग
▪️ डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेन्टेशन इंजिनिअरींग
▪️ डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरींग

Advertisement

तीन वर्षाचा डिप्लोमा केल्यानंतर तुम्ही बीटेक (B. Tech) आणि बीई (B.E.) साठी ॲडमिशन घेऊ शकता. हा कोर्स केल्यानंतरतुम्हाला इंजिनियरिंगच्या डायरेक्ट दुसऱ्या वर्षाला ऍडमिशन मिळणार आहे.

9) ITI Courses: आय टी आय म्हणजे इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना इंडस्ट्रियल लेवलला कशाप्रकारे काम करायचं आहे, हे शिकायला मिळणार आहे. या आयटीआय कोर्समध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आहेत.

Advertisement

▪️ आयटीआय इलेक्ट्रिशियन कोर्स
▪️ आयटीआय प्लंबर कोर्स
▪️ आयटीआय वेल्डर कोर्स
▪️ आयटीआय टर्नर कोर्स
▪️ आयटीआय मेकॅनिकल कोर्स

आयटीआयचा कोर्स केल्यानंतर सुद्धा तुम्ही डिप्लोमा इन इंजीनियरिंग कोर्स सुद्धा करू शकता. म्हणजेच त्याला आपण पॉलीटेक्निक असं नाव आहे.

Advertisement

10) Certificate Courses:

▪️ वेब डिझाइनिंग कोर्स
▪️ इथिकल हैकिंग कोर्स
▪️ ट्राफिक डिझाईन
▪️ ॲप डेव्हलपमेंट

Advertisement