आमिर खानच्या घटस्फोटामागील खरे कारण आले समोर..! फातिमामुळे नव्हे, तर ‘या’ कारणामुळे दिली किरण रावला सोडचिठ्ठी..!
बाॅलिवूड अभिनेता आमिर खान व किरण राव यांच्याकडे बॉलिवूडमधील सर्वात ‘परफेक्ट कपल’ म्हणून पाहिले जात होते. मात्र, या जोडीने अचानक आपला १५ वर्षांचा सोन्याचा संसार मोडला. एकमेकांपासून वेगळं होण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला होता.
आमिर खान व किरण राव यांच्या संसाराला कोणाची दृष्ट लागली, कशामुळे दोघांनी एकमेकांपासून होण्याचा निर्णय घेतला, याचा शोध अनेक जण घेत होते. अभिनेत्री फातिमा सना शेख हिच्यामुळेच आमिरने किरणला सोडल्याचे म्हटले जात होते. त्यासाठी सोशल मीडियावर फातिमाला मोठ्या प्रमाणात ट्रोलही करण्यात आले.
तर काहींनी आमिरच्या स्पष्टवक्तेपणामुळेच वैतागलेल्या किरण राव हिनेच त्याच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा होती. मात्र, यापैकी एकही कारण खरे नाही. अखेर त्यांच्या घटस्फोटामागील खरं कारण समोर आलंय.
एका वृत्तानुसार, गेल्या काही वर्षात आमिर आणि किरण राव हे दोघेही लग्न या संकल्पनेच्या पलिकडे विचार करीत होते. त्यांच्यात कुठलेही वाद किंवा मतभेद नव्हते; परंतु आयुष्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन बदलला होता. त्यामुळेच यापुढे केवळ मित्र म्हणूनच एकत्र राहू, असा विचार त्यांनी केला.
एकमेकांपासून घटस्फोट घेण्याची ही प्रक्रिया अर्थात दिसते तितकी सोपी नव्हती. आमिर आणि किरण यांना आपली मानसिक तयारी करण्यासाठी जवळपास 2 वर्षे लागली. 2019 पासून ते विभक्त होण्याचा विचार करीत होते. अखेर काही दिवसांपूर्वी त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय जाहीर केला.
दरम्यान, आमिर खाने याचे किरण राव हिच्याआधी रीना दत्तासोबत लग्न झाले होते. मात्र, त्यांनी 2000 मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आमिरने किरण राव हिच्यासोबत लग्नगाठ बांधली.
‘लगान’ या चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. केवळ एका फोन काॅलनंतर ते मनाने जवळ आले. पुढे दोघांमध्ये मैत्री अन् त्याचे रुपांतर प्रेमात व पुढे लग्नात झाले होते.