SpreadIt News | Digital Newspaper

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ शनिवार, 17 जुलै 2021

मेष (Aries) : विसंवादाचे कारण उकरून काढू नका. मुलांवरील खर्च वाढू शकतो. भागीदाराशी क्षुल्लक मतभेद संभवतात. अडकून पडलेले काम मार्गी लागेल.

Advertisement

वृषभ (Taurus) : उगाच राईचा पर्वत केला जाईल असे होऊ देवू नका. कामाव्यतिरिक्त इतर भानगडी निस्तराव्या लागतील. वेळेचा अपव्यय टाळावा. वैवाहिक जीवनात ताणतणाव राहील.

मिथुन (Gemini) : मनस्ताप वाढण्याची शक्यता आहे. तांत्रिक बाजूंचा नीट अभ्यास करावा. स्थावर संबंधीचे प्रश्न उद्भवू शकतात. हातातील अधिकाराची जाणीव ठेवा.

Advertisement

कर्क (Cancer): सामाजिक प्रतिष्ठेचा विचार कराल. सहकार्‍यांची मदत घ्यावी लागेल. आर्थिक कामे वेळेत पार पडतील. वडीलांशी खटके उडू शकतात.

सिंह (Leo) : व्यावसायिक स्पर्धेत सावधान रहा. धार्मिक कार्याचा आनंद घ्याल. भावंडांचा विरोध होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक फायद्यावर लक्ष केन्द्रित राहील.

Advertisement

कन्या (Virgo) : इतरांना स्वत:चे महत्त्व पट‍वून द्याल. आशावादी दृष्टीकोन ठेवावा. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींकडे अधिक लक्ष राहील.

तूळ (Libra) : मुलांबाबत चिंता निर्माण होईल. आजचा दिवस कष्टात जाईल. स्वातंत्र्यप्रिय विचार कराल. चुकीच्या संगतीत अडकू नका.

Advertisement

वृश्चिक (Scorpio) : जवळच्या मित्रांशी वितुष्ट येऊ शकते. जमिनीच्या कामातून चांगला मोबदला मिळेल. काही कामे तुमचा कस पाहतील.

धनु (Sagittarius) : महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. डोकेदुखीचा त्रास वाढू शकतो. महत्वाकांक्षेला योग्य वळण द्यावे. दिवस मनाजोगा व्यतीत कराल.

Advertisement

मकर (Capricorn) : मनातील चिंतेला आवर घाला. कामात अधिकार्‍यांचा सल्ला मिळेल. कागदपत्रांची योग्य जुळवणी करावी लागेल. मनात काही गैरसमज उत्पन्न होऊ शकतात.

कुंभ (Aquarius) : महत्वाकांक्षेच्या जोरावर कामे हाती घ्याल. छोट्याश्या अपयशाने खचून जाऊ नका. इच्छा नसताना प्रवास करावा लागेल.

Advertisement

मीन (Pisces) : बिनधास्तपणे वागून चालणार नाही. जोडीदाराशी वाद वाढू शकतो. वयोवृद्धानी आरोग्याची काळजी घ्यावी. नवीन कामात अधिक कष्ट पडतील.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement