SpreadIt News | Digital Newspaper

‘कॅप्टन कुल’वर शाळेत धडा..! माहीचा जीवनप्रवास शाळेत शिकविला जाणार, अधिक जाणून घेण्यासाठी वाचा..

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. भारतीय क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेण्यात माहीचा मोठा वाटा आहे. त्यामुळे त्याचा मोठा चाहता वर्ग आहे.

धोनीच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 मध्ये पहिला टी-20 वर्ल्डकप, 2011चा वन-डे वर्ल्ड कप आणि 2013ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. आयसीसीच्या तीन प्रमुख स्पर्धा जिंकणारा तो जगातील एकमेव कर्णधार आहे.

Advertisement

मागील वर्षी १५ ऑगस्टला महेंद्रसिंग धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सध्या तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळतो. या संघालाही धोनीने आतापर्यंत तीन वेळा आयपीएल चषक जिंकून दिला आहे.

महेंद्रसिंग धोनीने आतापर्यंत अनेक गोष्टी साध्य केल्या आहेत. त्याचा जीवनप्रवास चित्रपटाच्या माध्यमातूनही जनतेसमोर आला आहे. मात्र, आता त्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Advertisement

कारण, भावी पिढीला प्रेरणा देणाऱ्या धोनीचा जीवनप्रवास शाळेत शिकविला जाणार आहे. माहीच्या आयुष्यावरील धडा शाळेच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे.

 

Advertisement
View this post on Instagram

 

A post shared by M S DHONI 🔵 (@msdhoni.status.07)

Advertisement

सोशल मीडियावर या धड्याचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हिंदी पुस्तकातील चॅप्टर 7 वर धोनीच्या आयुष्यावरील हा धडा आहे. धोनीचा आवडता आकडाही 7 हाच होता. भारतीय संघाची, तसेच सीएसके संघाची त्याची जर्सीही 7 क्रमांकाचीच होती.

Advertisement

दरम्यान, हिंदी पुस्तकातील या धड्यात धोनीचा संपूर्ण जीवनप्रवास मांडण्यात आला आहे. या धड्यात त्यालाच टीम इंडियाचा कर्णधार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हा फोटो जुना असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

दरम्यान, महेंद्रसिंग धोनीने आपल्या क्रिकेट करियरमध्ये 90 कसोटीत 4876 धावा केल्या. तसेच 350 वन-डेत 10773 धावा, तर 98 टी-20 मध्ये त्याच्या नावावर 1617 धावा आहेत.

Advertisement

आयपीएलच्या पुढील पर्वात दोन नवीन संघांचा समावेश होणार असल्याने ‘मेगा ऑक्शन’ होणार आहे. प्रत्येक फ्रँचायझीला फक्त चार खेळाडूंनाच संघात कायम राखता येईल. त्यात चेन्नई सुपर किंग्स धोनीबाबत काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/impnews

Advertisement