SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दहावीचा निकाल जाहीर..! परीक्षा न होताही ‘या’ शाळांचा निकाल शून्य टक्के, 11वी प्रवेशासाठी ‘सीईटी’ कधी होणार..?

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (न झालेल्या) दहावीच्या परीक्षेचा राज्याचा निकाल 99.95 टक्के लागल्याचे जाहीर करण्यात आले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे परीक्षा न झाल्याने अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार केलेला निकाल ऑनलाईन जाहीर झाला.

राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागातील एकूण 15,75,806 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी 15,75,752 विद्यार्थ्यांचे मूल्यमापन शाळांनी दिले. त्यातील 15,74,994 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

दहावीच्या निकालाची वैशिष्ट्ये

Advertisement

– कोकण विभागाचा निकाल (100%) सर्वाधिक, तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा (99.84 %).
– नियमित विद्यार्थिनींचा निकाल 99.96%, तर विद्यार्थ्यांचा निकाल 99.94 %.
– दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 97.84 % लागला.

– राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 6,48,683 विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, 6,98,885 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 2,18,070 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, 9356 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत आहेत.

Advertisement

– 957 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण
– 22384 शाळांचा निकाल 100 टक्के

– राज्यातल्या 9 शाळांचा निकाल 0 टक्के
– मार्च २०२० च्या तुलनेत निकालाची टक्केवारी 4.65% जास्त आहे.

Advertisement

– खासगी विद्यार्थ्यांची संख्या 28,424 असून, निकालाची टक्केवारी 97.45 आहे.
– काही शाळांनी विद्यार्थ्यांचे मूल्यांकन न पाठविल्याने राज्यातील 4922 विद्यार्थ्यांचे निकाल राखीव.

वेबसाईट क्रॅश
दहावीचा निकाल http://result.mh-ssc.ac.in आणि http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर झाले. मात्र, निकाल जाहीर होताच दोन्ही वेबसाईट तब्बल 40 मिनिटांहून अधिक काळ डाऊन झाल्या होत्या. त्यामुळे निकाल पाहण्यात अडचणी येत होत्या.

Advertisement

अकरावी प्रवेशासाठी लवकरच ‘सीईटी’
आता अकरावी प्रवेशाकडे सगळ्यांचे लक्ष लागले असून, त्यासाठी वैकल्पिक ‘सीईटी’ घेणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. जे विद्यार्थी ‘सीईटी’ देऊ इच्छितात, त्यांच्यासाठी पोर्टल सुरु करणार आहोत.

‘सीईटी’ची डेडलाईन 21 ऑगस्टपर्यंत असून, याबाबत बोर्डाकडून लवकरच नोटिफिकेशन जारी करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी सांगितले.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/impnews

Advertisement