मध्यप्रदेशमधील (Madhyapradesh) विदिशा (Vidisha) जिल्ह्यातील गंजबासौदामध्ये जवळजवळ 30 गावकरी एका विहिरीमध्ये (30 People Fall Into Well) पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनास्थळी NDRF, पोलीस आणि एसडीआरएफची टीम दाखल झाली असून मदतकार्य सुरू आहे.
घटना नेमकं कशी घडली?
गंजबासौदामधील लालपठार गावात ही घटना घडली आहे. विहिरीमध्ये एक मुलगा पडला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी गावातील बऱ्याच लोकांनी धावाधाव करून, पोहोचून त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. लोकांनी एकच आरडाओरडा केल्यामुळे गावातील इतर लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
मुलाला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात गावातील काही तरुण विहिरीत पडले. विहिरीजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. विहिरीभोवती कित्येक बघ्यांची गर्दी झाली आणि इतक्या लोकांचे वजन आणि दबाव वाढल्याने विहिरीच्या भोवती असलेल्या मातीची घसरण होऊ लागली त्यामुळे अचानक विहिरीच्या आजूबाजूला उभे गावकरी विहिरीत पडले.
विहिरीच्या कठड्याभोवती सध्या पावसामुळे मातीचं काय होतं याची कल्पना आपल्याला असेलच! त्या गावातील गावकरी घटनास्थळी जमा होऊन माती घसरुन रात्रीचा अंधार असल्यामुळे पडले. त्यामुळे त्यावेळी विहिरीत (well) नेमकं झालं तरी काय, हे काही समजेना. त्यामुळे अनेक जण त्यात अडकले. दुर्घटनेनंतर घटनास्थळावर आरडाओरड आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
पोलीस आणि अग्निशमन दलाला माहिती मिळताच गावात घटनास्थळी धाव घेतली. NDRF, पोलीस आणि एसडीआरएफची टीम (SDRF) सुद्धा घटनास्थळी दाखल झाली आहे.अंधार असल्याने मदतकार्यामध्येही अडचणी येत आहेत. आतापर्यंत अंदाजे 20 जणांना विहिरीतून बाहेर काढण्यात यश (20 people were rescued) आलं आहे. तर 3 लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहीती आहे.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यावेळी त्यांनी दत्तक घेतलेल्या मुलीच्या विवाह सोहळ्यात असताना त्यांनी त्याठिकाणीच कंट्रोल रूम बनवून वेळोवेळी घटनेबद्दल माहिती घेतली. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे, असं मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews