दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या, म्हणजे 16 जुलै 2021 रोजी जाहीर होणार असल्याची घोषणा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर उद्या (शुक्रवारी) दुपारी 1 वाजता हा निकाल पाहता येणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
कोरोनामुळे यंदा दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. मूल्यांकनानुसार निकाल जाहीर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या मूल्यांकनाचे काम संपले असून, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर केला जाणार असल्याचे जाहीर केले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे १५ जुलैपर्यंत ‘एसएससी’ निकाल जाहीर केला जाणार असल्याचे यापूर्वी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले होते. मात्र, एक दिवस उशिराने हा निकाल जाहीर होत आहे.
दरम्यान, राज्याच्या शिक्षण विभागाने निकालासाठी पर्यायी मूल्यांकन निकष जाहीर केले होते. त्यानुसार नववीच्या वार्षिक परीक्षेतील गुण, दहावीच्या युनिट टेस्ट आणि प्री-बोर्डमधील विद्यार्थ्यांच्या कामगिरीच्या आधारे मूल्यांकन करुन यंदाचा निकाल जाहीर केला जाणार आहे.
दहावीचा निकाल कसा पाहणार..?
maharashtraeducation.com या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
मुख्यपृष्ठावरील महाराष्ट्र इयत्ता 10 च्या निकालाच्या 2021च्या लिंकवर क्लिक करा.
आपणास एका नवीन पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल.
आपली क्रेडेन्शियल्स टाइप करा आणि लॉग इन करा.
आपला एसएससी निकाल स्क्रीनवर दिसेल.
संदर्भासाठी निकालाचे प्रिंटआउट डाउनलोड करा.