SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकिंग: शरद पवार राष्ट्रपती पदाचे उमेदवार असणार का?; शरद पवार यांनी खुद्द स्वत:च केला खुलासा

देशामधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपती पदाचा उमेदवार म्हणून विरोधकांकडून पाठिंबा मिळेल आणि ते भाजपाविरोधी गटाचं राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत प्रतिनिधित्व करतील अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्यात.

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्याशी त्यांच्या झालेल्या भेटीगाठी, त्यानंतर सुरु झालेल्या काँग्रेसविरहीत तिसऱ्या आघाडीच्या चर्चा आणि आगामी विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांनी घेतलेली राहुल गांधींची भेट अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत.

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला खुलासा :

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरून सुरु असलेल्या चर्चांवर स्पष्ट शब्दात खुलासा करत सांगितलं आहे. तसेच, ‘मी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उभा राहणार असल्याचं वृत्त पूर्णपणे खोटं आहे’, असं पवार म्हणाले.

Advertisement

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये भाजपाकडे बहुमत असल्याचे स्पष्ट संकेत देत पवारांनी आपण उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार नसल्याचं सांगितलं आहे.

“एका पक्षाकडे 300 हून अधिक खासदार असताना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा निकाल काय असणार आहे मला ठाऊक आहे. मी राष्ट्रपती पदासाठी निवडणुकीमध्ये उमेदवार नसेन,” असं पवारांनी स्पष्ट केलं आहे.

Advertisement

2024 च्या सार्वत्रिक निवडणुका असोत की राज्य निवडणुका, निवडणुका फार दूर आहेत, राजकीय परिस्थिती बदलत आहे. 2024 च्या निवडणुकीत मी कोणतेही नेतृत्व स्वीकारणार नसल्याचेही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर भेटीबाबत…

Advertisement

प्रशांत किशोर यांच्या भेटीसंदर्भातही शरद पवार यांनी आज स्पष्टीकरण केले. प्रशांत किशोर मला दोनदा भेटले, मात्र त्यावेळी आम्ही केवळ त्यांच्या कंपनीबद्दल बोललो. प्रशांत किशोर यांनी मला सांगितले की त्यांनी निवडणुकीची रणनीती आखण्याचे काम सोडले आहे. 2024 च्या निवडणुकींमध्ये किंवा राष्ट्रपती पदाच्या निवडणुकींमध्ये नेतृत्व कोणाकडे असावं यासंदर्भात आमची चर्चा झाली नाही, असं पवारांनी स्पष्ट केलं.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement