SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

भारताचा इंग्लंड दौरा अडचणीत..! ऋषभ पंतनंतर टीममधील आणखी एकाला कोरोनाची बाधा, तर तिघे ‘आयसोलेशन’मध्ये..!

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाभोवती कोरोनाचा फास आणखी घट्ट होताना दिसत आहे. भारतीय खेळाडूंना दिलेली मोकळीक आता अंगलट आलीय. त्यामुळे संपूर्ण इंग्लड दौराच अडचणीत येण्याची शक्यता आहे.

फूटबाॅलचा युरो चषक पाहण्यासाठी गेलेल्या विकेटकिपर ऋषभ पंतला सुरवातीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर आता टीम इंडियातील आणखी एका सदस्याला कोरोनाने घेरल्याचे समजतेय.

Advertisement

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या टेस्टला 4 ऑगस्टपासून सुरवात होणार आहे. त्यामुळे 20 दिवसांच्या ब्रेकवर गेलेले खेळाडू काल (बुधवारी) डरहॅम इथे बायो-बबलमध्ये जाण्यासाठी एकत्र आले. तत्पूर्वी त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली.

त्यात सुरवातीला ऋषभ पंत व त्याच्यानंतर सपोर्ट स्टाफमधील एकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. शिवाय कोचिंग स्टाफमधील आणखी तिघांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ‘आयसोलेशन’मध्ये ठेवले आहे.

Advertisement

भारताचा आक्रमक फलंदाज व यष्टीरक्षक ऋषभ पंत मिळालेल्याच सुट्टीत युरो कप स्पर्धेतील इंग्लंड विरुद्ध जर्मनीचा सामना पाहण्यासाठी गेला होता. प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये बसूनच त्याने हा सामना पाहिला होता.

सध्या इंग्लंडमध्ये कोरोना व्हायरसच्या डेल्टा-3 रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. ऋषभ पंतलाही त्याचीच बाधा झाली असून, मागील 8 दिवसांपासून तो विलगीकरणात आहे. आता त्याची प्रकृती सुधारली असली, तरी खबरदारीचा उपाय म्हणून तो आणखी काळ विश्रांती करणार आहे.

Advertisement

भारतीय संघ डरहॅमला सराव सामना खेळणार आहे. मात्र, त्यात पंत सहभागी होणार नाही. पंतची प्रकृती सुधारण्यास आणखी किती दिवस लागतील, याबाबत काहीही सांगण्यात आले नाही.

इंग्लंड टीममधील 7 जणांना कोरोनाची लागण झाल्याने पाकिस्तानविरुद्धच्या सीरिजसाठी संपूर्ण टीमच बदलावी लागली होती. त्यामुळे टीम इंडियाने अधिक खबरदारी घेणे आवश्यक असताना, खेळाडू बिनधास्त फिरत राहिले आणि त्याचाच फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/impnews

Advertisement